Availability: In Stock

Handabhar Chandnya (Sanhita Ani Lekh) | हंडाभर चांदण्या (संहिता आणि लेख)

150.00

ISBN: 9788194459132

Publication Date: 01/03/2021

Pages: 107

Language: Marathi

Description

दत्ता पाटील हा लेखक आपल्या एकांकिका आणि दीर्घाकांतून सतत ग्रामीण आणि नागर जीवनातले ताण मांडत आला आहे. त्याच्या हंडाभर चांदण्या या दीर्घाकातलं वाट पाहाणं हे वेटिंग फॉर गोदोच्या जातकुळीतलं नाही. गोदोतलं वाट पाहाणं रूपकात्मक आहे, वैराण झालेल्या जगण्याच्या विराटपणावरचं भाष्य आहे. हंडाभर चांदण्यात जगण्याचं विराणपण रूपकातून नव्हे तर प्रत्यक्षच समोर येतं. पण या-वाट पाहण्यातली तीव्रता गोदोतल्या व्लादिमिर आणि एस्ट्रॅगॉनच्या वाट पाहण्याइतकीच जीवघेणी आहे.

ज्या गावात वर्षानुवर्षे दुष्काळ ठाण मांडून बसला आहे, जिथे सरकारी पाण्याचा टँकर अनेक अर्जविनंत्यांनंतरही कधीही आलेला नाही आणि हंडाभर पाण्यासाठी बायाबापड्यांना दहा दहा मैल वणवण करावी लागते, तिथे पाण्याच्या एका थेंबासाठी होणारी तगमग ही जीवनमरणाच्या सीमेवर येते. त्यामुळेच मावळवाडीच्या संभाने निर्वाणीचा उपाय म्हणून तहसिलदारबाईलाच ओलिस ठेवलं आहे. तिने जिल्ह्याच्या कार्यालयात फोन करून गावासाठी टँकर मागवावा, तो आल्यावर पहिला हंडा भरला जाईल आणि मगच तिची सन्मानाने सुटका होईल.

दत्ता पाटीलने हा वंचितांचा अवकाश वाट पाहण्यातल्या निरर्थकतेने, त्याच्या जोडीला पेरलेलल्या चांदण्या, सूर्य, सरणाचा उजेड, रिकामे हंडे या प्रतिमांतून, शब्दांच्या वाक्यांच्या पुनरुक्तीतून भरत नेला आहे. अख्खं गाव संभाकडे डोळे लावून बसतं आणि संभा टँकरकडे. त्यामुळे संभाची नजर ही अख्ख्या गावाची नजर होते आणि पूर्वदिशेकडून सरकत हळूहळू अस्ताला जाणारा सूर्य हा असा प्रतिक्षेचं प्रतिक होतो. या सूचकतेमुळे आणि संवादांतल्या नेमकेपणामुळे या सर्व अनुभवाला टोकदारपणा प्राप्त होतो. मोठा नाट्यपरिणाम घडवण्यासाठी मोठ्या घटनांची नव्हे तर रंगमंचीय अवकाशात नाट्यमय ताण निर्माण करण्याची गरज असते हे या दीर्घाकाने दाखवून दिलंय…..

Additional information

Book Author