Description
प्रत्येकच मायावी प्रयोग देह विटाळीत नसतो शापित अहिल्ये ! ऊठ ! तुझ्या उध्वस्त मुक्या गात्रात मी प्राण ओततो आहे. सृष्टीतील प्रत्येक जीव इतर घटकांचे देणे लागतो. ही मानवता कवीचे काव्यसंकुल विश्वात्मक करून जाते. मानवी जागृती हीच मानवकल्याणाची महत्त्वाची पायरी आहे. या प्रत्ययावर मानवी प्रेमाची राखण कवी रमेश मगरे स्वतःच्या हृदयात करतात. याला कारण या प्रलयकारी समाजव्यवस्थेवर एकतर त्यांचा विश्वास नसावा, किंवा जगण्यातील काट्यांनी ते विवश झाले असावेत. त्यामुळे जीवनातील स्थैर्य शापित तर होणार नाही ना, ही भीती त्यांना कायम ग्रासताना दिसते. येथेच ही कविता गूढ होते.एकूण प्राणिमात्राविषयी, जीवनाविषयी या कवीला लळा आहे. हृदयाच्या आत खोल खोल सरकत जाणाऱ्या कवीच्या जाणिवा हे त्यांच्या कवितेचे बलस्थान आहे. कवितेचा कवीशी संवाद होताना समाजाला सत्त्वाच्या भूमीची ओळखही करून देण्यास कवी विसरत नाही.