पुरस्कारAward २ मिनिटांचे वाचन 2 min read

शब्दालय प्रकाशनच्या सुमती लांडे यांचा ‘सुवर्णमुद्रा दिवाळी अंक परंपरेची’ सन्मानाने गौरव Shabdalaya’s Sumati Lande Honoured for Preserving the Marathi Diwali Magazine Tradition

मराठी दिवाळी अंकांची गुणवत्तापूर्ण परंपरा सातत्याने जपल्याबद्दल शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूरच्या सुमती लांडे यांना मुंबईतील सुवर्णमहोत्सवी दिवाळी अंक पुरस्कार सोहळ्यात ‘सुवर्णमुद्रा दिवाळी अंक परंपरेची’ हा विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.

Sumati Lande of Shabdalaya Prakashan, Shrirampur, received the special “Suvarnamudra Diwali Ank Paramparachi” honour for preserving the quality and continuity of Maharashtra’s Marathi Diwali magazine tradition.

मराठी भाषा गौरव दिन आणि कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंतीनिमित्त 27 फेब्रुवारी 2026 रोजी दादर-पश्चिम येथील धुरू हॉलमध्ये विशेष साहित्यिक आणि सांस्कृतिक सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूरच्या सुमती लांडे यांना

‘सुवर्णमुद्रा दिवाळी अंक परंपरेची’ हा विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.

मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई आयोजित राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष होते. गेली 50 वर्षे सातत्याने सुरू असलेल्या या स्पर्धेने मराठी दिवाळी अंकांच्या साहित्यिक परंपरेला महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

मराठी दिवाळी अंकांच्या 117 वर्षांच्या परंपरेत सातत्य राखत दर्जेदार अंक प्रकाशित करणाऱ्या संपादक आणि प्रकाशकांचा विशेष गौरव या सोहळ्यात करण्यात आला.

शब्दालय प्रकाशनने ग्रामीण भागातून दर्जेदार मराठी साहित्य, वैचारिक लेखन आणि विविध साहित्यप्रकार वाचकांपर्यंत पोहोचवले आहेत. सुमती लांडे यांच्या नेतृत्वाखाली शब्दालयने मराठी दिवाळी अंक परंपरेचे सातत्य आणि साहित्यिक गुणवत्ता जपली. या कार्याची दखल घेत त्यांना ‘सुवर्णमुद्रा दिवाळी अंक परंपरेची’ सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले.

दादर सार्वजनिक वाचनालय, काशिनाथ धुरू हॉल ट्रस्ट, मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. भाषा, साहित्य, पत्रकारिता, ग्रंथालय चळवळ आणि विचारपरंपरा यांचा अर्थपूर्ण संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला.

कार्यक्रमाला संजय घाडी, अशोक पाटील आणि सहायक पोलीस आयुक्त संजय धुमाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अशोक कोठावळे, अरुण शेवते आणि नीलिमा कुलकर्णी हे विशेष निमंत्रित होते. रवींद्र मालुसरे, शुभा द. कामथे, विकास होशिंग, ॲड. देवदत्त लाड, संजीव गुप्ते, प्रशांत घाडीगावकर, रमेश सांगळे, आत्माराम गायकवाड आणि नितीन कदम यांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न झाला.

हा सन्मान सुमती लांडे यांच्या साहित्यिक कार्याबरोबरच शब्दालय प्रकाशनच्या मराठी भाषा, साहित्यनिर्मिती, दिवाळी अंक संस्कृती आणि वाचनपरंपरेतील योगदानाचेही मानांकन आहे.

A special literary and cultural programme marking Marathi Language Pride Day and the birth anniversary of poet Kusumagraj was held at Dhuru Hall, Dadar West, Mumbai, on 27 February 2026. During the programme, Sumati Lande of Shabdalaya Prakashan, Shrirampur, received the “Suvarnamudra Diwali Ank Paramparachi” honour.

The event marked the golden jubilee year of the state-level Diwali magazine competition organised by the Marathi Vrittapatra Lekhak Sangh, Mumbai. Conducted continuously for 50 years, the competition has provided an important platform for recognising quality writing, editing and publishing within Maharashtra’s 117-year-old Marathi Diwali magazine tradition.

Under Sumati Lande’s leadership, Shabdalaya Prakashan has published quality Marathi literature and introduced readers to diverse writers, subjects and literary forms. The honour recognised her role in preserving the continuity, editorial quality and cultural significance of Marathi Diwali publications.

The programme was jointly organised by the Dadar Sarvajanik Vachanalaya, Kashinath Dhuru Hall Trust, Marathi Vrittapatra Lekhak Sangh Mumbai and Marathi Vichardhara Pratishthan. It brought together Marathi language, literature, journalism, library culture and intellectual thought on a common platform.

Sanjay Ghadi, Ashok Patil and Assistant Commissioner of Police Sanjay Dhumal attended as chief guests. Editors Ashok Kothawale, Arun Shevate and Neelima Kulkarni were special invitees. Members and office-bearers of the organising institutions were also present.

The honour celebrates both Sumati Lande’s literary journey and Shabdalaya Prakashan’s continuing contribution to Marathi books, Diwali magazines, publishing and Maharashtra’s reading culture.

शेअर कराShare

संबंधित व्यक्तीPeople

संबंधित घडामोडीRelated stories

पुरस्कार Award

प्रवरा उद्योग समूहाचे स्मृतिचिन्ह—शब्दालयच्या वाटचालीतील अभिमानास्पद आठवण

साहित्य, समाज आणि संस्थात्मक सहकार्याशी जोडलेल्या शब्दालयच्या विस्तृत प्रवासाची साक्ष देणारे हे स्मृतिचिन्ह प्रवरा उद्योग समूहाशी असलेल्या…

A Commemorative Honour from Pravara Industry Group—A Proud Memory for Shabdalay

This commemorative memento associated with the Padmashri Dr. Vitthalrao Vikhe Patil Cooperative Sugar Factory Ltd. and Pravara Industry Group…

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना लि. आणि प्रवरा उद्योग समूह, प्रवरानगर.

पुरस्कार Award

अवघीचे उच्चार’ कवितासंग्रह प्रकाशन सोहळा—शब्दालयासाठी अभिमानाचा क्षण

कवी बापू हळवे यांच्या ‘अवघीचे उच्चार’ कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रकाशिका सुमतीताई लांडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मराठी कविता, लेखक आणि…

‘Avagheche Uchchar’ Poetry Collection Launch—A Proud Moment for Shabdalay

The launch of poet Bapu Halwe’s Marathi poetry collection ‘Avagheche Uchchar’, attended by publisher Sumatitai Lande as a prominent guest, celebrated…

अभिनंदनार्थ निमंत्रण समिती

पुरस्कार Award

विशेष सहकार्याबद्दल सुमती लांडे यांचा गौरव—शब्दालयासाठी अभिमानाची स्मृती

श्रीरामपूर येथे विशेष सहकार्याबद्दल सुमती लांडे यांना प्रदान करण्यात आलेले हे सन्मानचिन्ह त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक उपक्रमांतील…

Sumati Lande Honoured for Special Cooperation—A Proud Shabdalay Memory

This commemorative memento, presented to Sumati Lande in Shrirampur for her special cooperation, celebrates her contribution to social, cultural and…

श्रीरामपूर येथील आयोजक—सन्मानचिन्हावर डॉ. सौ. कमलजीत कौर बत्रा

सर्व पुरस्कार व सन्मानAll Achievements & Honours पुस्तके पाहाBrowse the books