arrow_back Back to Books
बेबीचं जग
Marathi

बेबीचं जग

Babycha Jag

person Ajita Kale
₹150 incl. all taxes
In stock
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

अजिता काळे या संवेदनशील लेखिकेचे हे अखेरचं पुस्तक. या आधी देशान्तरीच्या गोष्टी सांगता... हे त्यांचे वेगवेगळ्या देशांच्या भेटीवर लिहिलेले पुस्तक वाचकांच्या स्मरणात असेल. बेबीचं जग या त्यांच्या नव्या पुस्तकात कुमारवयीन बेबी नावाच्या बुद्धिमान मुलीच्या इवल्या विश्वातली लोभस कथाचित्रं आहेत. आजूबाजूच्या माणसांना, लहानसहान आनंदी, दुःखी क्षणांना न्याहाळणाऱ्या आणि त्यांच्याबद्दल वेगवेगळे प्रश्न स्वतःशी निर्माण करणाऱ्या बेबीच्या दृष्टीत एकीकडे नितळ निरागसता आहे; आणि दुसरीकडे जगाबद्दलचं समज-उमज पातळीवरचं येऊ घातलेलं एक निर्व्याज शहाणपणही. तिच्या डोळ्यांतल्या, मनातल्या अपार कुतूहलाला समजून घेत, तिच्या व्यक्तित्त्वाला समृद्ध अवकाश पुरवणारे तिचे व्यवसायाने डॉक्टर असलेले आई-वडील हे तिचे या जगातले तिला सर्व काही लख्ख दाखवून देणारे दोन संवेदनशील आरसे आहेत... एकाअर्थी लेखिकेचे हे आत्मपर लेखन-अजिता काळे यांच्या बालपणीचे हे मनस्वी कवडसे ! त्यातली तरलता, हळुवारता भावणारीही नि भुरळही घालणारी... प्रत्येकाला आपल्या अलवार बालपणाशी पुन्हापुन्हा घेऊन जाणारी...

Book Images

About the Author

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review