भक्तिपरंपरेचे आंतरप्रांतीय अनुबंध

Bhaktiparamparecha Antarprantiy Anubandh

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
ISBN
9789348054210
भाषा
मराठी

₹५००

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

डॉ. सतीश बडवे हे मराठी साहित्याचे जाणते आणि महत्त्वाचे अभ्यासक आहेत हे सर्व परिचितच आहे. विशेषतः मध्ययुगीन मराठी साहित्याचा त्यांनी खोलवर धांडोळा घेऊन त्यासंबंधी काही महत्त्वाची सूत्रे मांडलेली आहेत. प्रस्तुत ग्रंथात त्याच्या आणखी पुढे जावून त्यांनी ‘भक्तिपरंपरेचे आंतरप्रांतीय अनुबंध' मांडण्याचा जो प्रयत्न केला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. सभोवताली धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय व्यवस्था भ्रष्ट आणि खिळखिळी होत असल्याच्या काळात कवींनी त्याला प्रतिक्रिया देवून अगदी सरळ सोप्या उपासनामार्गाचा पुरस्कार करून समाजाची नवी बांधणी केली. महाराष्ट्रात रामदेवराय यादवाच्या पतनापासून नामदेव, ज्ञानेश्वर, एकनाथ ते तुकाराम - म्हणजे शिवाजी राजाचा उदय - असे ते झाले. विशेष म्हणजे असेच कार्य आंध्र, कर्नाटक, तमिळनाड, पंजाब, उत्तरेतील प्रांत, बंगाल, असे सगळीकडेच जवळपास एकाचवेळी घडले. हा अत्यंत महत्त्वाचा अनुबंध शोध हे या ग्रंथाचे सगळ्यात मोठे फलित आहे, असे मला वाटते. आपली भारतीय एकात्मता ही वरवरची नसून तिची अशी आंतरिक बैठक आहे याची महत्त्वाची जाणीव हा ग्रंथ करून देतो. तीच याची सगळ्यात मोठी उपलब्धी आहे.

Book highlights

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये

भक्तिपरंपरेचे आंतरप्रांतीय अनुबंध — highlight भक्तिपरंपरेचे आंतरप्रांतीय अनुबंध — highlight भक्तिपरंपरेचे आंतरप्रांतीय अनुबंध — highlight भक्तिपरंपरेचे आंतरप्रांतीय अनुबंध — highlight भक्तिपरंपरेचे आंतरप्रांतीय अनुबंध — highlight
Read a preview

काही पाने वाचा

पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा

About the author

लेखकाविषयी

डॉ. सतीश बडवे | Dr. Satish Badwe

संपूर्ण परिचय पाहा
More by Dr. Satish Badwe

डॉ. सतीश बडवे यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like
In the news

घडामोडी आणि सन्मान

कात्रण

राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या भारतीय भक्तिपरंपरेचा अभ्यास

शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या सतीश बडवे यांच्या भक्तिपरंपरेचा आंतरप्रांतीय अनुबंध या पुस्तकात महाराष्ट्रासह भारतातील विविध…

वृत्तपत्रातील पुस्तक परीक्षण