बिबट्या, वाघाच्या मिशा आणि इतर गोष्टी

Bibtya, Waghachya Mishya Aani Itar Goshti

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
२०२६
पृष्ठे
१२४
आवृत्ती
First Edition
ISBN
9789348054265
भाषा
मराठी

₹२२०

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

बिबट्या, वाघाच्या मिशा आणि इतर गोष्टी' हा जितेंद्र कुवर यांचा तिसरा कथासंग्रह आहे. यातील कथा किशोरवयीन मुलाच्या नजरेतून ग्रामीण भागाचे दर्शन घडवतात. यात ग्रामजीवनाशी संलग्न असलेले प्राणी, पशुपक्षी, काही श्रद्धा, मिथके यांवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. बालमनावरील याबाबींचा परिणाम आणि त्यांनी दिलेला निरागस प्रतिसाद ह्या कथांत चितारलेला आहे. किशोरवयीन मुलाच्या आकलनक्षमतेने उभे केलेले हे चित्रण आहे. ह्या चित्रणात काही प्रासंगिक नर्म विनोदाचे, काही अव्यक्त भयाचे, तर काही कातरहळवे संवेदनशील मनाचे प्रकटीकरण होते. ह्या कथा मनावर खोलवर बिंबले गेलेले गतकाळाचे गारूड वाहून आणतात. छोट्या छोट्या प्रसंगातून निर्माण झालेले पेचप्रसंग, ते सोडवण्यासाठी केलेला उपद्व्याप, प्रसंगी झालेला अनपेक्षित शेवट आणि त्याला किशोरवयीन मनाने दिलेला प्रतिसाद ह्या कथांतून दिसून येतो. ह्या कथा किशोरवयीन मुलांना गोष्टींचे एक नवे दालन उघडून देत आहेत. यातील कथा प्राणी, पशुपक्षी, झाड ह्या घटकांवर चितारल्या आहेत. निसर्गाकडे कनवाळू आणि संवेदनशील मनाने पहावे हे ह्या कथांचे प्रयोजन आहे. ह्या कथा प्रौढ वाचकांसाठी देखील वाचनीय ठरतील. प्रौढांना त्या नकळत त्यांच्या बालपणात घेऊन जातील. काही कथा आपल्याच आजुबाजूला घडल्याचे त्यांना स्मरण होईल आणि त्याकाळात प्रवेश करून त्याची मौज प्रौढ वाचकांना अनुभवता येईल. करिता हा कथासंग्रह सर्व वयांतील वाचकांसाठी वाचनाचे समृद्ध साधन ठरावा असा आहे. आबा महाजन 

Book highlights

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये

बिबट्या, वाघाच्या मिशा आणि इतर गोष्टी — highlight बिबट्या, वाघाच्या मिशा आणि इतर गोष्टी — highlight बिबट्या, वाघाच्या मिशा आणि इतर गोष्टी — highlight बिबट्या, वाघाच्या मिशा आणि इतर गोष्टी — highlight बिबट्या, वाघाच्या मिशा आणि इतर गोष्टी — highlight
Read a preview

काही पाने वाचा

पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Jitendra Kuwar

जितेंद्र कुवर | Jitendra Kuwar

संपूर्ण परिचय पाहा
More by Jitendra Kuwar

जितेंद्र कुवर यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like