दिलखुलास यशवंतराव

Dilkhulas Yashwantrao

लेखक Vishwas Nivrutti Thoke
प्रकाशक
Sanskruti Prakashan
प्रकाशन वर्ष
२०१९
पृष्ठे
२३९
भाषा
मराठी

₹२९०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

महाराष्ट्राचा अभिमान, साताऱ्याची शान असणारे यशवंतराव चव्हाण एकेकाळी राष्ट्राचे उपपंतप्रधान होते. त्यांचं सारं जीवनच आव्हाने स्वीकारून ती पार करताना अनेक रोमहर्षक अशा घटना भरून अवर्घ जीवनचं रोमांचकारी होऊन गेलं. जीवनाच्या सर्वांगाला स्पर्श करून मनमुराद आनंद घेऊन समृद्ध झालेलं आहे. अशा त्यांच्या जीवनातील हृदयस्पर्शी घटनांचा श्री. विश्वास ठोके गुरुजींनी शोध घेऊन 'दिलखुलास यशवंतराव' हे वाचनीय पुस्तक तयार केलं आहे. यशवंतराव जीवघेण्या गरीब परिस्थितीत जन्माला आले, ही गोष्ट खरी आहे. गरिबीचं चर्वण करणं त्यांना पसंत नव्हतं. गरिबीला तुडवीत जाणं त्यांना जमलं होतं. जीवघेण्या गरीब स्थितीत मुलगा जन्माला येतो अन् या खंडप्राय राष्ट्राचा उपपंतप्रधान होतो. हा एक चमत्कार नाही का ? तो घडला हे सत्य आहे. त्यामुळेच महाराष्ट्र शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक व औद्योगिक या सर्वक्षेत्रात संपन्न होऊन देशात प्रगत राज्यात सामील झाला. टिळक हायस्कूलमध्ये असतानाचं सरांनी विचारले, 'तुम्ही पुढे कोण होणार?' यशवंतरावांचं उत्तर सर्व मुलांहून अगदी वेगळं होतं. 'मी यशवंतराव चव्हाण होणार!' खरं म्हणजे रुढार्थाने हे जरी उत्तर असले, तरी खऱ्या अर्थानं ती आयुष्याच्या उभारणीची केलेली प्रतिज्ञाच होती. श्रीनिवास पाटील माजी राज्यपाल, सिक्कीम

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like