या पुस्तकाविषयी
-पूर्वरङ्गातील बारा नमनं ते उत्तरङ्गातील आरती हे नमन-खेळे या लोकनाट्यप्रकाराचे रङ्गतंत्र आहे. कोकणातील नमन-खेळे सादर करणाऱ्या मंडळींनी हे रङ्गतंत्र जाणीवपूर्वक टिकून ठेवलेले आहे. काहींनी नमन-खेळेच्या ढाच्याला धक्का न पोहचवता शक्य तितके बदल केलेले दिसून येतात. उदा. पडद्यावरच्या गणपतीऐवजी सिंहासनावर बसलेला, उंदीरावर बसलेला गणपती दाखविणे, गणेश जन्माची कथा रङ्गमंचावर दाखविणे, नमन खेळेच्या प्रवेशापूर्वी श्री विष्णूची देवसभा दाखविणे इत्यादी.
नमन-खेळे हा कुणबी समाजाने संवर्धन केलेला कलाप्रकार आहे, त्यामुळे कुणबी समाजाच्या संस्कृतीला, परंपरेला व कलापरंपरेला अनुसरून त्याचे सादरीकरण होत असते. नमन-खेळे हा याच मातीतील हा कलाप्रकार असल्याने, कुणबी समाजाच्या जीवन-विकासाबरोबर ह्या कलाप्रकारचे संगोपन, संवर्धन झालेले दिसून येते.
प्रस्तुत लोकनाट्यप्रकारातील देवादिकांचे मुखवटे (रुपडी) तसेच हरीण, डुक्कर, वाघ, बैल, घोडा या प्राण्यांचे बांबूपासून सांगाडे तयार करणे इत्यादी कुणबी समाजातील जाणकार लोक तयार करत होते व आहेत. याचा अर्थ हा कलाप्रकार निर्माण करणारे हे लोक तज्ज्ञ असले पाहिजेत. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात मुखवटे, सांगाडे तयार करण्याचे तंत्र सांगितलेले आहे, हे खरे असले तरी त्या काळातील निरक्षर समाजाने मुखवट्यांचे शास्त्र त्यापासून अवगत केले असे म्हणता येणार नाही."
पुस्तकाची छायाचित्रे
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.