arrow_back Back to Books
महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक स्थित्यंतरांचा इतिहास (खंड ३) (१९५१-२०१०)

महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक स्थित्यंतरांचा इतिहास (खंड ३) (१९५१-२०१०)

Maharashtrachya Samajik-Sanskrutik Sthityantarancha Itihas (Khand 3) (1951 – 2010)

storefront Maharashtra Rajya Sahitya Ani Sanskruti Mandal
qr_code ISBN: 9789393599872
calendar_today 2024
menu_book 1054 pages
₹528
incl. all taxes
Only 1 left
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक स्थित्यंतरांच्या त्रिखंडात्मक इतिहासलेखनाच्या प्रकल्पातील हा तिसरा व अखेरचा खंड असून यात १९५१ ते २०१० या कालखंडातील घडामोडींचा मागोवा घेण्यात आला आहे. १९५० नंतरचा कालखंड हा जगभरातच वैचारिक परिवर्तनाचा, संगणकीय क्रांतीचा आणि माहिती-तंत्रज्ञनात्मक युगधर्माचा कालखंड आहे. तसेच स्वातंत्र्योत्तर नवभारताच्या निर्माणाचा आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यासाठी दिलेल्या लढ्याचा कालखंड आहे. गांधीहत्येनंतर महाराष्ट्रात पेटलेल्या ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचा, दलितांच्या अस्मिता जागरणाचा आणि पुरुषसत्ताक समाजधारणांविरुद्ध स्त्रियांनी उभ्या केलेल्या मुक्तिसंघर्षाचा हा कालखंड आहे. ह्या पार्श्वभूमीवर ह्या अभ्यासात राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक संस्था व समाजगटांच्या संरचना व आतरसंबंधातील बदलांचा तपास करण्यावर भर देण्यात आला आहे. आपापल्या राजकीय तत्त्वज्ञानानुसार संसदीय राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांच्या भूमिका, शासकीय व निमशासकीय क्षेत्रांतील ध्येयधोरणांत झालेले बदल, लोकमत व लोकाभिरुची संस्कारित करणाऱ्या माध्यमांचे प्रेरणास्त्रोत, परिवर्तनवादी चळवळी व दबावगटांच्या हालचाली, शैक्षणिक परिवर्तन, अल्पसंख्यांक व गरिबांचे शिक्षण, मराठी भाषेचे संवर्धन अशा विविध संदर्भात झालेल्या प्रयत्नांचा व चळवळींचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. औद्योगिक, उत्तर औद्योगिक व माहिती तंत्रज्ञानात्मक संस्कृतीत व्यापारी व सामाजिक संस्थांच्या कार्यशैलीत झालेले बदल; सामाजिक चालीरीती, आहारविहार, खेळ आणि करमणूक, धर्म व विधिकर्म, कायदा, गुन्हेगारी व मानवी हक्कांच्या संदर्भात झालेल्या बदलांचा तपास करण्यात आला आहे. तसेच साहित्य, नाटक, सिनेमा आणि कला क्षेत्रांतील घडामोडींचा, प्रेरणा-प्रवृत्ती व अभिरुचीतील बदलांचा शोध घेण्यात आला आहे.

Book Images

About the Author

person

डॉ रमेश वरखेडे | Dr Ramesh Varkhede

View Full Profile arrow_forward

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review

You May Also Like