पडछाया

Padchaya

लेखक Bhagyashree Noolkar
प्रकाशक
Mehta Publishing House
प्रकाशन वर्ष
२०२४
पृष्ठे
१३६
ISBN
97893357208871
भाषा
मराठी

₹२२०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

'पडछाया' हा वैशिष्ट्यपूर्ण 'विज्ञानकथासंग्रह'. ललितकथांप्रमाणेच या 'विज्ञानकथाही' मानवी तरल भावनांना स्पर्शन जाणाऱ्या आहेत. विज्ञानयुगातही; अगदी क्लोन बेबी-रोबोनिर्मितीतूनही मानवी मनाचे दुःख जाणणाऱ्या या कथा आहेत. मनाचे भावबंध जपतात या कथा. उदा. 'ऐलमा पैलमा' या कथेतील दत्तक घेतलेली ईशा ! 'मानेला गाठ' असल्याने तिला पुन्हा आश्रमात सोडतात. त्यानंतर घरी यांत्रिक मुलगी नंदिता येते. ती हसत सर्वांना शेकहँड करते; पण त्याचवेळी आजारी ईशाची आठवण घरातील सर्वांना घायाळ करते. मग लागलीच तिचा सांभाळ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला जातो. विज्ञानकथांतील नवीन शोधांमुळे मानवी नात्यांतील विचित्र गुंता गोंधळात टाकतो. 'जावई माझा भला' ही कथा वैज्ञानिक मदतीनेच गुंता सोडवते, तेव्हा त्यातील रंजक विनोद आपल्याला हसवतो व शहाणपणही शिकवतो. तंत्रज्ञानाच्या झपाट्यातूनही या कथा माणूसपणाच्या खुणा शोधतात; इथेच भारतीयत्व दिसते. इतर देशांच्या संस्कृतीं व आधुनिक ज्ञानाची कवाडं उघडणाऱ्या या कथा आहेत. रहस्यरंजन करून, वाचकांना विश्वज्ञान देऊन प्रसंगी जागृत करतात या कथा. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेध घेऊन भविष्यकाळातील समाज कसा असेल, मानवाचे परस्पर संबंध कसे असतील, याचं उत्तम चित्रण करणाऱ्या या कथांचं वाचक निश्चितच स्वागत करतील, हा विश्वास वाटतो. विज्ञानसाहित्याचा हा प्रवाह मराठी साहित्याला समृद्धीकडे नेणारा आहे, हे या कथांतून दिसते.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like