या पुस्तकाविषयी
रंगनाथ पठारे हे ऐंशीच्या दशकापासून सातत्याने कथात्मक साहित्याची निर्मिती करीत आहेत. अत्यंत संवेदनशील मनाचा, विवेकनिष्ठ, विज्ञाननिष्ठ, मानवतावादी दृष्टी असलेला प्रखर नैतिकतेची जाण असलेला, सृजनाची अनावर ओढ असलेला आणि मानुषता मूल्यांना शिरोधार्य मानून जीवनाचा प्रवास करणारा हा लेखक आहे.
आपल्या साहित्यकृतीमधून रंगनाथ पठारे यांनी जीवनाच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि वाङ्मयीन वास्तवाचे अत्यंत जिवंत आणि प्रत्ययकारी दर्शन घडविलेले आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण व नागरी समाजजीवनाच्या, तसेच खीजीवनाच्या व्यथा-वेदना सामर्थ्याने मांडलेल्या आहेत. मराठी कथात्मक साहित्यविश्वात त्यांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. मात्र असे असले तरी, मराठी समीक्षेने त्यांच्या साहित्याची म्हणावी तशी दखल घेतलेली दिसत नाही. प्रा. पंडित रानमाळ यांनी या दोन संशोधनात्मक ग्रंथांतून ही उणीव दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रा. पंडित रानमाळ यांनी रंगनाथ पठारे यांच्या कादंबरी वाङ्मयाचे मौलिक स्वरूप उलगडून दाखविले. त्यांच्या साहित्यातील मूल्यगर्भ अनुभवविश्व, मानवी समाजाच्या कल्याणाविषयीची आंतरिक तळमळ, अनुभवविश्वातील वैविध्यपूर्णता आणि भाषाशैली यांचा सखोल विचार व रंगनाथ पठारे यांचे मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीला कोणते योगदान लाभले, याचे मार्मिक चिंतन मांडले आहे. ही सारी मीमांसा डॉ. पंडित रानमाळ यांच्या लेखनातून समर्थपणे व्यक्त होते.
डॉ. देवकर्ण तुळशीराम मदन
संशोधक, मार्गदर्शक व ज्येष्ठ समीक्षक
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.