संथ थंड संगाशी संग

Santh Thand Sangashi Sang

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
२०२६
पृष्ठे
१८२
आवृत्ती
First Edition
ISBN
9789348054067
भाषा
मराठी

₹३२५

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

'संथ थंड संगाशी संग' हा सुधीर राजाराम देवरे यांचा सहावा कवितासंग्रह. त्यांचा संपूर्ण काव्य प्रवास 'माझ्या आत्मनिष्ठ जीवन जाणिवांचा वस्तुनिष्ठ आविष्कार!' या शब्दांत ते मांडत आले आणि त्यांच्या कविता वाचून ते बहुतांशपणे खरे आहे. तरीही ह्या संग्रहातल्या कवितांत त्यांनी ठरवून भूमिका घेतल्याचे दिसते. त्यांची ही भूमिका मानव धर्माची पाठराखण करणारी असून आगळ्या वेगळ्या संवेदनशीलतेने चित्रमय दृश्यात ती आविष्कृत होते. समकालीन उलथापालथीच्या काळात विचारी माणसाची वाढत जाणारी अस्वस्थता, सामाजिक, राजकीय चिंतन, मानवीय समष्टी समस्यांतून भूमिकांची उत्स्फुर्तता, अभिव्यक्तीतील सार्वजनिकपण, संपूर्णत्व की अपूर्णत्व, सामाजिक बांधिलकीतील असणे-नसणे, सत्तेची नशा, देश, देव, धर्म, व्यवस्था, प्रांत, भाषा यातून कवीचे आत्मचरित्र घडत जाते की बिघडत जाते. अशा सर्वांगिण भूमिका घेत व्यवस्थेच्या भोवाड्यात नेमके कोणते सोंग कसे वठवावे- नाचवावे, हा प्रश्न संग्रहभर अगम्य संगीतात आत्मनिष्ठतेतून समष्टीत निनादत राहतो. सुधीर देवरे यांच्या कविता वाचकाच्या मनन-चिंतनाचा विषय होत कालातीत महाकाव्यासारख्या सलगपणे सर्वदूर कायम वाचल्या जातील ! - शरणकुमार लिंबाळे

Book highlights

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये

संथ थंड संगाशी संग — highlight संथ थंड संगाशी संग — highlight संथ थंड संगाशी संग — highlight
Read a preview

काही पाने वाचा

पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा

About the author

लेखकाविषयी

डॉ. सुधीर राजाराम देवरे | Dr. Sudhir Rajaram Deore

संपूर्ण परिचय पाहा
More by Dr. Sudhir Rajaram Deore

डॉ. सुधीर राजाराम देवरे यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like
In the news

घडामोडी आणि सन्मान

कात्रण

साचत गेलेल्या अनुभवांचा गाळ, अस्तित्व दुभंगाची नोंद

कवी सुधीर राजाराम देवरे यांच्या ‘संथ थंड संगाशी संग’ या कवितासंग्रहातून साचत गेलेले अनुभव, अंतर्मनातील अस्वस्थता, अस्तित्वातील…

दिव्य मराठी – डीबी स्टार, छत्रपती संभाजीनगर