लेखिका आशा पैठणे यांच्या साहित्यप्रवासातील दोन महत्त्वाच्या पुस्तकांचा संयुक्त लोकार्पण सोहळा नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे. शब्दालय प्रकाशन प्रकाशित ‘गगनजाई’ हा कथासंग्रह आणि चपराक प्रकाशन प्रकाशित ‘दिले घेतले’ या आत्मकथेची दुसरी आवृत्ती या कार्यक्रमात वाचकांसमोर येणार आहे. कथा, आत्मानुभव आणि जीवनातील विविध भावछटा यांचा वेध घेणाऱ्या या दोन्ही पुस्तकांमुळे आशा पैठणे यांच्या लेखनविश्वाची वेगवेगळी रूपे अनुभवता येतात.
हा लोकार्पण सोहळा 11 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5.30 वाजता, कै. सुधाकरराव डोडफोडे सभागृह, नाना-नानी पार्क, शिवाजी नगर, नांदेड येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती सूर्यकांता पाटील राहणार असून, डॉ. निर्मोही फडके, ठाणे यांच्या शुभहस्ते पुस्तकांचे लोकार्पण होईल. माजी महापौर सौ. जयश्री निलेश पावडे, प्रा. स्नेहल पाठक आणि प्रा. चारुता देशपांडे आसोलेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कथांचे अभिवाचन डॉ. योगिनी सातारकर पांडे करतील, तर सूत्रसंचालन डॉ. अश्विनी भोरे करणार आहेत. हा कार्यक्रम मराठी साहित्य, कथालेखन आणि आत्मकथनाच्या रसिकांसाठी महत्त्वाचा साहित्यिक सोहळा ठरणार.
तपशील माहिती
लेखिका :आशा पैठणे
पुस्तक :1 गगनजाई
साहित्यप्रकार: कथासंग्रह
प्रकाशक; शब्दालय प्रकाशन
पुस्तक :2 दिले घेतले
साहित्यप्रकार: आत्मकथा
आवृत्ती :दुसरी आवृत्ती
प्रकाशक: चपराक प्रकाशन
कार्यक्रम: दोन्ही ग्रंथांचा लोकार्पण सोहळा
दिनांक: 11 डिसेंबर 2025
स्थळ :कै. सुधाकरराव डोडफोडे सभागृह, नाना-नानी पार्क, शिवाजी नगर, नांदेड
कार्यक्रमाध्यक्ष: श्रीमती सूर्यकांता पाटील – माजी केंद्रीय राज्यमंत्री, भारत सरकार
शुभहस्ते डॉ. निर्मोही फडके, ठाणे – सुप्रसिद्ध लेखिका, भाषा-साहित्य संशोधक व व्याख्याता
प्रमुख उपस्थिती :सौ. जयश्री निलेश पावडे – माजी महापौर, नांदेड
प्रमुख पाहुणे: प्रा. स्नेहल पाठक, माजलगाव – अध्यक्ष, संस्कार भारती, देवगिरी प्रांत
प्रमुख पाहुणे; प्रा. चारुता देशपांडे आसोलेकर – ज्येष्ठ लेखिका, नांदेड
कथांचे अभिवाचन: डॉ. योगिनी सातारकर पांडे
सूत्रसंचालन: डॉ. अश्विनी भोरे