प्रकाशन सोहळाBook launch १ मिनिटांचे वाचन 1 min read

मुंबई विद्यापीठाच्या 'काव्यबंध' पुस्तкаचे खेड येथील आय.सी.एस. कॉलेजमध्ये प्रकाशन 'Kavyabandh' Textbook for Mumbai University FYBA Published at I.C.S. College, Khed

मुंबई विद्यापीठाच्या एफ.वाय.बी.ए. (दुसरे सत्र) अभ्यासक्रमातील 'काव्यबंध' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आय.सी.एस. कॉलेज, खेड (चिपळूण) येथे दिमाखात संपन्न झाला. आधुनिक मराठी कवितेच्या प्रवासावर आणि मानवी संवेदनशीलता अन् अनुभवांच्या स्थित्यंतरांवर प्रकाश टाकणाऱ्या या कार्यक्रमास विद्यापीठाचे व महाविद्यालयीन अनेक मान्यवर उपस्थित होते.

The publication ceremony of the textbook 'Kavyabandh', prescribed for Mumbai University's FYBA (Semester II) Marathi curriculum, was grandly held at I.C.S. College, Khed (Chiplun). The event witnessed the presence of esteemed dignitaries, academic board members, and editors.

मराठी English

मुंबई विद्यापीठाच्या एफ.वाय.बी.ए. (दुसरे सत्र) मराठी अभ्यासक्रमासाठी निर्धारित केलेल्या 'काव्यबंध' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा २३ नोव्हेंबर २०१९ रोजी आय.सी.एस. कॉलेज, खेड (चिपळूण) येथे पार पडला. या प्रकाशन सोहळ्यास अभ्यास मंडळ अध्यक्ष डॉ. गुरव सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सारंग सर, पुस्तकाचे संपादक डॉ. नीलकंठ शेरे सर, प्रकाशक सुमती लांडे, डॉ. अनिल सपकाळ, संयोजक प्रा. पाटोळे सर आणि अभ्यास मंडळाचे इतर सदस्य उपस्थित होते.

मानवी जीवनानुभव, भौतिक, आर्थिक व सामाजिक स्थित्यंतरे यांच्याशी जोडलेली मानवी संवेदनशीलता आणि आधुनिक मराठी कवितेचा इतिहास या पुस्तकातून अभ्यासला जातो. कवींच्या साद-प्रतिसादातून निर्माण झालेली आधुनिक मराठी कवितेची विविध वळणे या ग्रंथाचा गाभा आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना मराठी साहित्याचे सखोल ज्ञान मिळते.

The official launch ceremony of the textbook 'Kavyabandh', curated for the Mumbai University FYBA (Semester II) Marathi syllabus, took place on November 23, 2019, at I.C.S. College, Khed (Chiplun). The event was graced by prominent academic leaders including Board of Studies Chairman Dr. Gurav, Principal Dr. Sarang, book editor Dr. Neelkanth Shere, publisher Sumati Lande, Dr. Anil Sapkal, and coordinator Prof. Patole alongside other board members.

The book explores how human sensitivities, social shifts, and economic environments shape human experiences. It delves deeply into the historical evolution of modern Marathi poetry, reflecting how poets responded to changing times. This textbook serves as a vital academic resource for undergraduate students studying Marathi literature.

शेअर कराShare

या घडामोडीतील पुस्तकेBooks in this story

संबंधित व्यक्तीPeople

संबंधित घडामोडीRelated stories

प्रकाशन सोहळा Book launch

सातपाटील कुलवृत्तांत

रंगनाथ पठारे यांची २०१९ मध्ये प्रकाशित झालेली ‘सातपाटील कुलवृत्तांत’ ही कादंबरी — कुळाचा शोध घेत सातशे वर्षे मागे जाणारा वंश, जात, धर्म आणि मराठा…

‘Satpatil Kulavruttant’: Rangnath Pathare’s Seven-Hundred-Year Search for Ancestry

First published in 2019 and now in its fifth edition, the novel follows a search for family roots seven hundred years into the past, through caste…

प्रकाशन सोहळा Book launch

‘माझं घर’ आणि ‘अधांतर अंधारात’

जयंत पवार यांचे ‘माझं घर’ हे नाटक आणि डॉ. मेघा केळूसकर यांचा ‘अधांतर अंधारात’ हा कवितासंग्रह — दोन्हींचे प्रकाशन बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण येथे…

‘Majha Ghar’ and ‘Adhantar Andharat’ Launched in Malvan

Jayant Pawar’s play and Dr. Megha Keluskar’s poetry collection were released together by Rangnath Pathare at Barrister Nath Pai Sevangan, Malvan, on…

Barrister Nath Pai Sevangan, Malvan (बॅ. नाथ पै सेवांगण, माल

प्रकाशन सोहळा Book launch

‘सुमती लांडे : समग्र कविता’

ज्येष्ठ कवयित्री सुमती लांडे यांच्या समग्र कवितेचा प्रकाशन समारंभ आणि साहित्यिक संवाद नाशिक येथे राजन गवस यांच्या हस्ते; विश्वास ग्रुपच्या सौजन्याने.

‘Sumati Lande: Samagra Kavita’: Book Launch and Literary Dialogue in Nashik

The collected poems of the senior poet were released by writer Rajan Gavas at a literary dialogue in Nashik, organised with Vishwas Group, Copper…

डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेज

सर्व कार्यक्रमAll Events पुस्तके पाहाBrowse the books