Maze Vidyapeeth

See more images

Maze Vidyapeeth

माझे विद्यापीठ

Publisher
Popular Prakashan
Published
1966
Pages
64
ISBN
9788171850822
Language
Marathi

₹90

incl. all taxes

Only 1 left

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

माझे


विद्यापीठ


मुक्त शैलीने आपल्या मुक्त वृत्तींचा आविष्कार करू पाहणारी नवी कविता आणि हळुवार, संवेदनाशील सौंदर्यात्मक प्रतिक्रियांनी नटलेली नवी कविता अशा दोन प्रकारची नवी मराठी कविता आजच्या काळात सहजपणे जाणवते.


काव्यनिर्मिती करणारा कवी, सामान्यतः यांपैकी एका गटात कुठेतरी गुरफटून जातो. हे दोन गट अलगपणे श्रेष्ठ आहेत तसेच ते संपूर्णपणे भिन्नही आहेत.


नारायण सुर्वे यांची कविता या दोन प्रवृत्तींमधून आपला असा एक मार्ग कोरीत जाताना आढळते.


असा एक मार्ग असू शकतो, हे त्यांच्या 'ऐसा गा मी ब्रह्म' या पहिल्या कवितासंग्रहाने पटवून दिले आहे व 'माझे विद्यापीठ' या त्यांच्या दुसऱ्या संग्रहाने ते मत अधिकच सिद्ध केले आहे.


नारायण सुर्वे हे पुष्कळ व वारंवार कवितालेखन करीत नाहीत. तरीही सुजाण, चिकित्सक, साक्षेपी वाचकांच्या मनांत त्यांच्या कवितेने स्वतःसाठी खास स्थान निर्माण केले आहे हे त्यांचे यश विशेषच होय.


आयुष्यातल्या नव्या अनुभवांना सामोरे होऊन व आपल्या कलासृष्टीत त्यांना चिरंतन सशब्द करणारी त्यांची प्रतिभा आता सूर्यफूलासारखी टवटवीत व प्रफुल्ल बनली आहे.

पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

नारायण सुर्वे | Narayan Surve

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा