Rutuchakra

See more images

Rutuchakra

ऋतुचक्र

Publisher
Popular Prakashan
Published
1956
Pages
148
ISBN
9788171857319
Language
Marathi

₹200

incl. all taxes

Only 1 left

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

ऋतूंच्या लावण्यमहोत्सवाची चित्रे रेखाटणारे हे ललितनिबंध आहेत. दुर्गाबाईंनी डोळे भरून सृष्टीचे दर्शन घेतले आहे. निसर्गाची बदलती रूपे, पशुपक्ष्यांच्या हालचाली, रंगगंधांच्या बोलक्या संवेदना त्यांनी एखाद्या शास्त्रज्ञाच्या डोळस कुतूहलाने न्याहाळल्या आहेत. परंतु या शास्त्रीय दृष्टिकोनाला काव्यात्म प्रतिभेची मिळालेली जोड हे या ललितनिबंधांचे खरे वैशिष्ट्य आहे. या सृष्टीतल्या सर्व सौंदर्याचा भौतिक आणि कलात्मक आस्वाद घेणारे सौंदर्यासक्त मन त्यांच्याजवळ आहे. तसेच, या तरल सौंदर्यानुभबांना सेंद्रिय रूप देण्याचे, या अतींद्रिय क्षणांना इंद्रियांकरवी अनुभवायला लावण्याचे सामर्थ्य त्यांच्या प्रतिभेच्या ठिकाणी आहे. जाईजुईच्या झेल्यासारखे हातात धरून हुंगावेसे वाटणारे पर्जन्यरूप सूर्यबिंब, पोपटाच्या पिलांसारखी दिसणारी बडाची हिरवी पाने, पारिजातकाच्या मोत्यापोवळ्यांच्या राशीतून फुटणारे श्रावणाचे हसू, फुलांच्या पायघड्यांबरून भूतलावर पदार्पण करणारा पुष्पमंडित भाद्रपद... हे सारे रूपरसरंगगंधांचे, लावण्यविभ्रमांचे जग दुर्गाबाईंचे हे निबंध वाचताना क्षणोक्षणी प्रत्ययाला येते. निसर्गाच्या चित्रलिपीचे रहस्य दुर्गाबाईंना उलगडले आहे याची साक्ष या निबंधसंग्रहात पानोपानी मिळते.

पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

दुर्गा भागवत | Durga Bhagwat

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा