Kshudhashanti Bhuwan

See more images

Kshudhashanti Bhuwan

क्षुधाशांती भुवन

Publisher
Shabd Publication
Language
Marathi

₹300

incl. all taxes

Only 1 left

  • Free shipping over ₹500
  • Secure online payment by UPI, card or netbanking
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

किरण गुरव ह्यांच्या कथा वाचताना हे सतत मनात येते की हा नव्या युगाचा, एकविसाव्या शतकाचा एक महत्त्वाचा शिलेदार आहे. मराठी लघुकथेला जे एक साचलेपण येऊ लागले होते, ते प्रथम जयंत पवार ह्यांनी एका फटक्यात नाहीसे केले. किरण गुरबही स्वतंत्रपणे तेच काम अधिक जोमाने करीत आहेत. त्यांची कथा लहान जिल्हा किंवा तालुकावजा जागेत घडते पण तिचा पट विशाल आणि खूप गुंतागुंतीचा आहे. मराठी साहित्याचे केंद्र पुणे-मुंबईकडून लहान गावांकडे संक्रमित झालेले आहे ह्याचा ठळक पुरावा म्हणजे गुरव ह्यांची कथा. कसदार भूमीतून सशक्त निरोगी कंद जोमाने उगवावा अशी ही कथा. तिच्यातले अस्सलपण असे की त्यांची कुठलीही कथा तिला कुठेही कापली तर तिला नवे धुमारे फुटतील इतकी जिवंत. नानाविध माणसे, त्यांच्या नानाविध जगण्याच्या तहा इथे दिसतातच पण त्यापेक्षा त्यांमधल्या व्यवस्थेमध्ये भरडून निघालेल्या माणसांबद्दलचा लेखकाचा जिव्हाळा त्या कथांना एका शहाणीवेचे अस्तर लावतो. मराठी साहित्याचे भवितव्य गुरव आणि त्यांचे समकालीन लेखक ह्यांच्या सशक्त हाती सुखरूप आहे, ह्याची खात्री किरण गुरव ह्यांच्या कथा वाचल्या की पटते. - महेश एलकुंचवार
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

किरण गुरव | Kiran Gurav

View Full Profile
किरण गुरव यांची पुस्तके

More by Kiran Gurav

View all
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा

Ittar Goshti

₹310