या पुस्तकाविषयी
About this book
तमाशाच्या बोर्डावर जन्माला आलेल्या कोल्हाटी समाजातील कुणा एका निर्मलाची ही कथा. ती कुणीतरी एक असली तरी एकमेव म्हणावं असं तिचं बुद्धिमान, चाणाक्ष, तडफदार व्यक्तित्व वंचितपणामुळे समाजाकडून पावलापावलांवर मिळत गेलेल्या नकारांनीच स्व-भानाची जागती जाणीव बाळगत, स्वतः वर ठाम विश्वास ठेवत हिमतीने चालणारं. तिच्या गुंतागुंतीच्या आयुष्याने अनेक प्रकारचं दान तिच्यापुढे टाकत तिला परदेशापर्यंत चालवत नेलं अनेक तन्हेच्या माणसांच्या सहवासात त्यांच्या आश्रयाने जगताना, वेगळ्या मातीत स्वतःला रूजवताना ती स्व-तंत्र होत घडत गेली. इतकच नाही तर स्व-अवकाशाचं, मुक्त विचारांचं एक क्षितिज स्वतःची स्वयंपूर्ण अशी ओळख विस्तारण्याची तिला एक ताकदही पुरवत गेलं. आत्मभानाची ज्योत स्वत मध्ये सतत तेवती ठेवत, स्वतःला सिद्ध करत नेलेल्या या निर्मलाच्या व्यक्तिमत्त्वाचा हा प्रवास म्हणूनच अचंबित करणारा असा आहे.
आत्मकथनाची एक आगळी नि प्रवाही अशी प्रयोगशील नवी वाट निवडून लिहिलेली ही शांता गोखले यांची तिसरी महत्त्वाची कादबरी अभिनव निवेदन-तंत्र, शैलीचा स्वाभाविक नि संवादी पोत आणि अनेकरंगी व्यक्तिरेखांचं ठसठशीत जिवतपण या वैशिष्ट्यांसह ही कादंबरी वाचकांना विविध जाणिवांनी समृद्ध करते, समांतरपणे जातिव्यवस्थेबद्दल, मानवी नातेसंबंधांबद्दल स्त्री-पुरुष नातेबंधांबद्दल-अस्वस्थ करणारे अनेक प्रश्नही ती वाचकांसमोर उपस्थित करत राहते!
रीटा वेलिणकर, त्या वर्षी या कादंबऱ्यांनंतरची शांता गोखले यांची हीही कादंबरी मराठी कादंबरीच्या विश्वात आपलं स्वतःचं स्थान निर्माण करेल, असं निश्चितपणे म्हणावं लागेल.
पुस्तकाची छायाचित्रे
Book images
लेखकाविषयी
About the author
शांता गोखले यांची पुस्तके
View all
More by Shanta Gokhale
अभिप्राय आणि मानांकन
Reviews & ratings
No reviews yet — be the first to share what you thought of this book.
Sign in to write a reviewNothing written here yet.
हे देखील पाहा
All books