Description
बाजरीचे उत्पादन प्रामुख्याने खरीप आणि उन्हाळी हंगामात घेतले जाते. बाजरीचा उपयोग प्रमुख अन्नघटक म्हणून प्रामुख्याने राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेशमध्ये केला जातो. बाजरीच्या उत्पादनात राजस्थाननंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. बाजरीवरती प्रक्रिया करून अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये वापर करणे गरजेचे आहे.
बाजरीपासून टिकाऊ पीठ किंवा सुजी तसेच त्याच्यावरती प्रक्रिया करून इतर पदार्थ तयार करण्याचे उद्योग उपलब्ध नसल्यामुळे तिचा वापर मर्यादित गरीब लोकांचे खाद्यअन्न म्हणूनच राहिलेला आहे. सध्याच्या संशोधनावरून असे आढळून आलेले आहे की, बाजरीमध्ये असणारी पौष्टिक द्रव्ये, अन्नघटक, मानवी शरीराचे बरेचसे आजार कमी किंवा बरे करण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. बाजरीपासून न्याहारींचे पदार्थ, गोड पदार्थ, स्नॅक फुड्स, बेकरी पदार्थ आणि व्यावसायिक पदार्थ कसे तयार करावेत आणि त्यासाठी लागणारे घटक पदार्थ व कृती यांची सविस्तर माहिती या मराठी पुस्तकात देण्यात आलेली आहे. मराठी वाचकास, गृहिणीस, पदार्थ निर्मितीकारास, संशोधकास तसेच आपले आरोग्य निरोगी सुदृढ, सशक्त राखणाऱ्यास खेडोपाडी आणि शहरी भागात सुद्धा या पुस्तकातील माहिती उपयुक्त ठरू शकेल याची आम्हाला खात्री वाटते.