Description

शोष पडला आहे घशाला

गिळून टाकायचं आहे काहीतरी आत
किंवा थुंकून फेकायचंय बाहेर तरी

पण
शोष पडला आहे घशाला
आणि उगवून आलंय एक उफराटं झाड
घशाच्या पाकळ नळीत
पायाखाली फांद्या आणि मस्तकावर मुळं
नाचवीत…