Availability: In Stock

Hambarvata | हंबरवाटा

250.00

ISBN :- 9788195979295

Publication Date :- 01/01/2023

Pages :- 142

Language :- Marathi

Description

भूमी, आभाळ आणि मातीवरली अवघी जीवसृष्टी मनापासून निरखत असताना मनात जे संवेदन दाटून येते त्याचा एकात्म अविष्कार करणारी कविता समकालीन मराठी कवितेत अपवादात्मक आहे. ग्रामीण जाणिवेची सरधोपट अभिव्यक्ती टाळून नवे काही देण्याचा सहजप्रवाही प्रयत्नही तसा तुरळकच. ‘हंवरवाटा’ मधली कविता या अर्थाने खूप महत्त्वाची आणि वेगळी ठरावी अशीच आहे.या कवितेला दुःखाची आणि मातीतल्या वेदनेची तीव्रतर लय आहे. सोबतच रानशिवारातल्या माणसांच्या जगण्याला लागलेली जिभाळी या कवितेतून एका निरंतर वेदनेसारखी वाहताना दिसते. या कवितेतून खी जीवनाचे कितीतरी पदर अतिशय आर्त रुप घेऊन समोर येत जातात. ‘उन्हापाण्याचा कुठला पिढीजात शाप घेऊन तू. शोधते आहेस तुझं माहेर…’ अशा ओळींमधून कष्टकरी बायांच्या जगण्याचे एक अनोखो रुपक ही कविता सगळीकडे मांडताना दिसते, तेव्हा तिचे सामर्थ्य आणि वेगळेपण ठळकपणे नजरेत भरते. रानवाटा, पाखरे, ओडेनाले, विहिरी, बोरीबाभळी, बाया माणसे यासह वेगवेगळ्या प्रतिमांमधून येणारी कृषी जोवनातली आत्यंतिक संवेदनशील समग्रता हा या कवितेचा विशेष आहे. आशयाचा तोल सांभाळत, दुःख भारीत होऊन व्यक्त होणारी संतोष आळंजकर यांची ही कविता कृषिजन संस्कृतीच्या पोटात शिस्न खेड्यातल्या वर्तमानाचा तळ शोधताना दिसते, तेव्हा एक वेगळे विश्व सहजपणे वाचकांसमोर उभे राहते. कवितेला आलेले प्रदीर्घ अशा चिंतनाचे रुप, जे या कवितेतून पहायला मिळते, ती समकालीन कवितेसाठी महत्वाची उपलब्धी ठरावी, एवढे सामर्थ्य या कवितेचे निश्चितपणे आहे.- श्रीकांत देशमुख

Additional information

Book Author