Description
डॉ. दिलीप धोंडगे यांनी ‘हरवले गाव’ या पुस्तकात त्यांच्या बालपणी गाव, समाज व गावसंस्कृती कशा प्रकारची होती आणि त्या काळात साजरे होत असणारे उत्सव तसेच गाव समाजाची सांस्कृतिक भूक कशा प्रकारे भागवत होते व समाजाला एकात्मता कशा प्रकारे प्रदान करत होते, याचे अत्यंत प्रत्ययकारक असे चित्रण केले आहे. यातील कोणत्या गोष्टी नव्याने आकार घेणाऱ्या गाव संस्कृतीत कायम राहतात हे सांगता येणार नाही. पण आपले हे अनुभव त्यांनी अक्षरबद्ध आणि ग्रंथबद्ध केल्यामुळे लोकसाहित्याच्या व गावसंस्कृतीच्या अभ्यासकांसाठी तो मूल्यवान दस्तऐवज ठरणार आहेच. पण त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढच्या पिढ्यांसाठी तो उत्तम असा सांस्कृतिक ठेवा असणार आहे. कारण हे त्यांचे सांस्कृतिक संचित आहे. या कामाबद्दल डॉ. धोंडगे अभिनंदनास पात्र आहेत. या पुस्तकाचे मराठी भाषक चांगल्या प्रकारे स्वागत करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.