Availability: In Stock

Indradhanuchya Kamaniver | इंद्रधनूच्या कमानीवर

100.00

Isbn:9789380617619

Publication Date:01/11/2013

Pages:72

Language:Marathi

Description

कवी राजेश जाधव यांचा ‘इंद्रधनुच्या कमानीवर’ हा पहिलावहिला कवितासंग्रह पहिलेपणाच्या खुणा घेऊन आला आहे. पहिला पाऊस पडून गेल्यानंतर मनाच्या आभाळावर कुठेतरी हळुवार भावनांचं इंद्रधनु कळत-नकळत उमटतं, तसंच, राजेश जाधव यांच्या कवितांचंही आहे. राजेश जाधव यांच्या कवितांमध्ये अंतर्गत लय आहे, नाद आहे. शब्दांची ताकद त्यांनी पुरती ओळखली आहे. त्यातूनच-‘शब्द माझा भिडू / शब्द कसा मोडू / वेळी प्राण सोडू / शब्दासाठी!’ यासारख्या सहजसुंदर ओळी ते लिहून जातात. कवी राजेश जाधव यांनी आपल्या शब्दांतून पूर्वसुरींशी असलेली नाळ लीलया जपली आहे. ज्यांच्यामुळे आपण शिकू शकलो, वाचू शकलो आणि लिहू शकलो अशा सर्वांचे ॠण कवी वेगवेगळ्या संदर्भातून व्यक्त करतो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जो मार्ग दाखवला त्याच मार्गावर कवी राजेश जाधव यांची कविता भविष्यातही दमदार वाटचाल करेल, असा विश्वास वाटतो. तसे संकेत त्यांच्या कवितांमधून नक्कीच मिळतात. अवतीभवतीचे पददलित, दीनदुबळ्यांचे शल्य, त्यांच्या वेदना कवीला स्वस्थ बसू देत नाहीत. त्यातूनच ‘घराच्या आगीवर कुणाच्या भाकरी शेकतंय कुणी…’ अशा ओळी कवी लिहून जातो. मात्र, त्याचबरोबर मतांसाठी वाट्टेल ते राजकारण करू पाहणाऱ्या तथाकथित पुढाऱ्यांना चोखपणे सुनावण्याची ताकदही या कवितेत आहे. भवतालच्या कटू वास्तवावर प्रहार करणारी कवीची लेखणी आईच्या आठवणीने व्याकूळही होते. मग ही व्याकुळता एखाद्या सासुरवाशिणीच्या मानसिकतेतून कवितेत व्यक्त होते. माहेराहून येणारी एस. टी. बसही आपल्या मायसारखी वाटते, ही तरलता कवीच्या शब्दांत आहे. आपण कबीराचा दास आहोत आणि चोखा आपला श्वास आहे, ही प्रामाणिक विनम्रताच कवीची वाटचाल योग्य दिशेने चालली असल्याचे दाखवून देते.

Additional information

Book Author