Availability: In Stock

Jata Nahi Jat | जाता नाही जात

150.00

ISBN: 9788190585743

Publication Date: 25/12/2007

Pages: 84

Language: Marathi

Description

भारतीय सांस्कृतिक व्यूहात जन्मणाऱ्या प्रत्येक माणसाला लागली जाणारी अथवा लावण्यात येणारी ‘जात’ ही एक बाह्य उपाधी असली, तरीही तिने आपल्या विकासक्रमात हळूहळू वंशाची जागा घेतल्यामुळे, एकीकडे ती ‘जन्मजात ‘ बनलेली आढळेल, तर एकीकडे ‘पिढीजात’ बनताना आढळेल, त्यामुळे तिच्या ठायीची कृत्रिमता लोप पावून ती ह्या भारतीय पर्यावरणात ‘स्वाभाविक’ बनताना आढळते. तसंच ती एक सामाजिक संस्था बनल्यामुळे एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे अनुवंशिकरित्या प्रवास करत करत ती अटळ, अढळ आणि अमर्त्य (immortal) बनलेलीही आढळते. खरे तर ‘जात’ ही फक्त भारतीय वस्तुस्थिती (ज्पहदसहदह) असल्याकारणाने, ती भारतीय सामाजिक पर्यावरणात वावरणाऱ्या वा जगणाऱ्या हर एक वंशाला वारसदारीनेच आपोआप प्राप्त होत असते. अशारितीने एकीकडे ती पिढीजातपणे, त्या त्या मानव- वंशासोबत चालत आलेली त्याची मिरासदारी ठरलेली आहे. त्या त्या जातीला मुकरर करण्यात आलेला तो तो विवक्षित व्यवसायसुद्धा त्याला क्रमप्राप्त असतो. अशा तऱ्हेने ही हिंदू मनुष्यमात्राला लाभणारी एक प्रकारची जन्मठेप असून, मरेपर्यंत तिच्यापासून सुटका नाही. कारण जन्मजातरित्या त्याच्या जातीच्या वाट्याला आलेल्या पारंपरिक व्यवसायातून त्याला बाहेर पडताच येत नाही. ह्या त्याच्या वाट्याला आलेल्या विशिष्ट व्यवसायावरूनच त्याची एकंदर समाजातील पत व जागा ठरत असल्यामुळे ‘जात’ त्याला आपापल्या जातीच्या ‘वाड्यात’ बंद करीत असते.