Description
जीबन नरह जन्म: ४-११-१९७० शिक्षण : : एम्. ए. (आसामी), गोहाटी युनिव्हर्सिटी. व्यवसाय : आसामीचे प्राध्यापक, ओ. डी. पी. कॉलेज, नागाव. प्रकाशित साहित्य : सहा कविता संग्रह, एक कादंबरी, एक स्मृति लेख संग्रह.हिंदी, मल्याळम्, बंगाली, ओरीसा, उडिया व इंग्रजी मधून कवितांचे अनुवाद. ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट गव्हर्मेंट ऑफ इंडियाची फेलोशिप सन २०००.‘युई युई !’ अशी पारंपरिक हाक देणाऱ्या, न गवसणाऱ्या एका आसामी जमातीची कवी जीबन नरह यांच्या कवितांमधून प्रकटलेली काव्यस्पंदने भावस्पंदने – विचारस्पंदने चिंतनस्पंदने या अनुवादित कवितेतून अवश्य पाहता येतील. आसामी भाषा – संस्कृतीची प्रकृती अनुभूती आणि प्रकटीकरण या बाबतीत आपल्याशी कुठेकुठे मिळतीजुळती आहे तसेच कुठेकुठे ती भिन्न स्वरुपाची आहे तेही या कवितांच्या माध्यमातून पाहता येईल.