Availability: In Stock

Kavita Dikshechya | कविता दीक्षेच्या

80.00

Publication Date : 01/10/2007

Pages : 80

Language : Marathi

Description

तुमचे ‘कविता दीक्षेच्या’ हे हस्तलिखित मी काल बारकाईने वाचून संपवले. आताच पुन्हा एकदा सर्व कविता वाचून संपविल्या. पुन्हा वाचाव्याश्या ‘वाटल्या ह्यातच तुमच्या कवितांमध्ये काहीतरी गूढ वेदना असल्याचे लक्षण आहे. नवकवींच्या कवितांना बहुधा ढोबळ शब्दांनी सपाट केलेले असते. तसे तुमचे झालेले नाही. सहजासहजी तिचे स्वरूप लक्षात येत नाही. कुठेही शब्दासाठी त्या अडखळत नाहीत. ओळी सपासप आतल्या वेदनेसारख्याच वार करत राहतात.एकूण कविता अतिशय उत्तम आहेत. – डॉ.भालचंद्र नेमाडे                                                                                                                                                                                            कविता दीक्षेच्या’ वाचले. या कवितांमधला स्वर प्रामाणिक वाटतो. त्यामुळे त्यात सहजता आली आहे. परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग म्हणून एक साधक कवितेकडे पाहतो आहे. एकाकीपणातला आधार, श्रद्धास्थान म्हणजे त्याची कविता. महानुभाव पंथाचे संदर्भ यात प्रतिमा, प्रतिकांच्या रूपाने येत असले तरी मानवी जीवनातला एकाकीपणा, सत्याचा शोध यांच्यापर्यंत ही कविता पोचते असे मला वाटते. – डॉ.दीपक घारे                                                                                                                                                           महानुभावीय-लीळाचरित्रात्मक शब्दकळा ह्या कवितेच्या स्थायीभावी आहे. मुलतः ती त्याच बोलीतून अवतरते; तरी तिचा अंतः प्रवाह आधुनिक वेदन – प्रवाहांचा आहे; जीवन जाणिवांचा आहे. गहन- गूढ आध्यात्मिक विचार आणि वेदनांचा, अर्थविस्तारक्षम वलयांचा सहजाविष्कार ही कविता करते. ते तिचे शक्तीस्थल आहे. नष्टभ्रष्ट स्थिती, दीक्षा, दृष्टपूत…. अशा असंख्य देखण्या देशी शब्दांमुळे लाभलेली नवता ही तिची नैसर्गिक वैशिष्ट्यपूर्णता ठरते. – डॉ.रविंद्र पाटील