Availability: In Stock

Kopat | कोपात

250.00

ISBN: 9789385527120

Publication Date: 29/05/2001

Pages: 188

Language: Marathi

Description

वसई, वसईकर आणि वसईची संस्कृती याबद्दल अपार प्रेम असलेले रेमंड मच्याडो यांची कादंबरी म्हणजे नुसती मन्याची कहाणी नाही तर भावोत्कट वसईकरांच्या धर्म, भाषा सहजीवन आणि परिसराचे त्यात घडत राहिलेल्या बदलांचे, विकासाचे समरस करून घेणारे दर्शन आहे. रेमंड मच्याडो यांची ही अस्सल वसईची नाळ जोडणारी भाषा, अर्थव्यक्तीतील आंतरिक उमाळा, वसईकरांचा धर्मभोळेपणा व हृदयात जपलेली मूल्ये यांची गाथा आहे. माणुसकीवरचा विश्वास, दुसऱ्याला मदत करणारी वृत्ती आणि परंपरा याचे हे फोटोग्राफिक छायाचित्रण, कुशलता प्रतिबिंबित करणारे शब्दबद्ध दर्शन, त्यात खदखदणारी अवस्थता जाणून वाचकांना त्यातल्या अकृतित्रमतेने, काळजाला भिडणारे झाले आहे. जुन्या नव्याचा, पौर्वात्य संस्कृती संक्रमण कालाचा, पाश्चिमात्य संस्कृतिच्या वाढत्या प्रभावाने निर्माण झालेल्या मानसिकतेचा आलेख आणि वसईकरांच्या सहज सुंदर स्वाभाविकतेचे दैनंदिन जीवनरंग ‘कोपात’ मध्ये रेमंड मच्याडो यांनी भरले आहेत. रेमंड मच्याडो यांच्या ‘कोपात’ मध्ये वसईच्या ख्रिस्ती समाजाचे प्रातिनिधिक चित्रण झाले आहे. मन्याचे बालपण, त्याचे आईवडील, परिसर, समाज, नातीगोती, त्या काळातील गावातील मानसिकता, आशा अपेक्षा, साधी करळ दृष्टी, निर्मळ मन, स्वप्न, निराशा, जगण्यासाठीचा संघर्ष, धर्म, भाषा, सुखाने सहजीवन जगण्यातील तत्त्वज्ञान, धार्मिक सलोखा, सामान्य कष्टकरी ख्रिस्ती, हिंदू, मुस्लीम कुटुंबांचे जगणे, त्यांचा जीवनसंघर्ष वाचकांच्या मनात भरतो. त्याचप्रमाणे त्यांची भाषा व निवेदनातील अस्सल मराठीपण ‘कोपात’ मधील भूगोलाइतकेच रम्य आणि वसईकरांच्या आजवरच्या वाटचालींचा काळ डोळ्यासमोर उभा करणारा आहे. मात्र रहदारीची साधने वाढल्यावर बदलत्या काळाबरोबर बदलत्या सामाजिक, राजकीय, आर्थिक बदलांच्या चाहुलीचे प्रत्यंतर देणारेही झाले आहे. काळवंडणारे वर्तमान, परागंदा होऊ लागलेली माणुसकी, महानगर होऊ घातलेल्या वसईत फैलावू पाहणारी संवेदनशून्यता, पैसा आणि चैन, मतलबापुरती नातीगोती, घर, कुटुंब, मित्र यांच्यातील संपुष्टात येऊ लागलेले ममत्त्व या सगळ्याची लेखकाला वाटणारी चीड वाचकाला आपलेच मनोगत वाटते.

Additional information

Book Author