Description
कोसला । भालचंद्र नेमाडे
‘कोसला’ वयाच्या अठराव्या वर्षी भेटली. कादंबरीला आता पन्नास वर्षे झाली. पूर्वी वाचलेले कित्येक लेखक वाढत्या वयाबरोबर आणि काळ-परिस्थिती बदलल्यावर मागे पडले. आवडेनासे झाले. तसं ‘कोसला’चं झालं नाही. अभिजातपणाचा हा एक पैलू असावा. जगण्याच्या या पन्नास वर्षांच्या ओघात कायम ती जवळ राहिली. आयुष्यातल्या सगळ्या बऱ्या-वाईट प्रसंगांत पांडुरंगाचा हुंकार ऐकू येत राहिला. एखादं पुस्तक असं संपूर्ण व्यापून राहावं ही आश्चर्याचीच बाब आहे. आता तर माझी खात्री माझी खात्रीच झाली आहे की जग सोडताना मला ‘कोसला’ आठवेल.
या कादंबरीने जे निर्लेप, अकृत्रिम जगायला शिकवल त्याची तुलना तर एखाद्या आध्यात्मिक गीतेशीच करता येईल. त्यामुळे ‘कोसला’वाल्याचा गौरव, हा आमच्याच गाभ्यातल्या अणुरेणूना तृप्ती देतो. ती तृप्तीची ढेकर ‘कोसला’वाल्याने ऐकावी म्हणून हे पत्र !
बाकी आम्हांला धुऊनपुसून साफ केलेत. हे धन्यवादच. त्यामुळे बरेच शुचिर्भूत जगता आले.
उषा पाटणकर
मुंबई






Reviews
There are no reviews yet.