Description
विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते. अध्यापनाबरोबर ते संशोधनामध्ये व्यस्त असत. डॉ. कुबल यांना लोकसाहित्याच्या अभ्यासामध्ये विशेष रुची होती. वसईच्या आण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात अध्यापन करीत असताना त्यांनी ठाणे जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, डहाणू या परिसरात दीर्घकाळ भटकंती करून आदिवासी जीवन संस्कृतीचे, त्यांच्या परंपरांचे, त्यांच्या कलाप्रकारांचे क्षेत्रीय संशोधन केले होते. कोणत्याही अभ्यासविषयाची सैद्धान्तिक पार्श्वभूमी यथोचित समजून घेणे महत्त्वाचे असते. हे लक्षात घेऊन डॉ. कुबल यांनी लोकसाहित्यविषयक विविध संकल्पनांची विस्तृत मांडणी या पुस्तकात केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ‘लोकसाहित्य’ ह्या संकल्पनेची नेमकी जाण येऊ शकेल. लोकसाहित्याच्या विद्यार्थी अभ्यासकांसोबत, जाणकार अभ्यासकही ह्या पुस्तकाचे स्वागत करतील असा विश्वास वाटतो.