Description
आपल्या गाडीसाठी जर कधीच पेट्रोल मिळाले नाही तर काय? याची तुम्ही कल्पना करू शकता? जर आपल्या घरातील लाईट, फ्रीज, टी.व्ही. लावण्यासाठी वीजच अस्तित्वात नसेल तर ? आपण रोजच्या जीवनात जी उर्जा वापरतो (जसे वीज, पेट्रोल) यांचे स्त्रोत कधीना कधी संपणार आहेतच. शिवाय त्यांच्यामुळे पृथ्वीवरच प्रदुषणही वाढते. स्वच्छ आणि पुनर्वापर करता येण्यासारख्या उर्जा स्त्रोतांची आपल्याला गरज आहे. भविष्य आवश्यक उर्जा स्त्रोत ‘जल उर्जा’ किंवा ‘जलविद्युत’ याबद्दल सखोल माहिती हे पुस्तक देते.