Description

शब्दालय प्रकाशन गेली ३० वर्षे प्रकाशन क्षेत्रात काम करीत आहे. महाराष्ट्रातील एक नामवंत प्रकाशन संस्था म्हणून या संस्थेचा लौकिक महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर पसरलेला आहे. मराठीतल्या अनेक महत्त्वाच्या लेखकांची पुस्तके शब्दालयने प्रकाशित केली आहेत. शब्दालयची आतापर्यंत ३५० हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. शब्दालय प्रकाशनास या क्षेत्रात महत्त्वाचा मानला जाणारा वि. पु. भागवत पुरस्कार २००२ साली प्राप्त झाला आहे.शब्दालयच्या बहुतांश पुस्तकांना विविध राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. शब्दालयची अनेक पुस्तके विविध विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहेत. शब्दालयची १२५ हून अधिक पुस्तके ग्रंथालय संचालनालयाच्या शासनमान्य यादीत समाविष्ट आहेत.