Availability: In Stock

Rath | रथ

250.00

ISBN: 9788194460015

Publication Date: 26/01/1984

Pages: 144

Language: Marathi

Description

१९८४ साली पहिल्यांदा प्रकाशित झालेल्या या कादंबरीला वाङ्मयीन चळवळींची विशेषतः ग्रामीण साहित्य चळवळीची पार्श्वभूमी आहे. या चळवळीतील विविध पातळ्यांवरील नेते, कार्यकर्ते, त्यांचे मनोव्यापार, त्यांच्या भूमिका; त्यांचे जगणे या साऱ्याचे वेधक चित्रण व विश्लेषण स्वाभाविकपणेच तिच्यात येते.

चळवळी या त्या त्या काळाच्या अपरिहार्य गरजा म्हणून निर्माण होत असतात. माणसं निमित्तमात्र असतात. ती नसती तर त्यांची जागा आणखी कोणीतरी घेतलीच असती, हे खरंच आहे. पण माणसं निवडण्यासाठीची उपलब्धता ही त्या त्या काळाची मर्यादा सुध्दा असते. या मर्यादेचा चळवळीच्या गतिचक्रावर, तिच्या भवितव्यावरही प्रभाव पडत असतो. आणि हे अपरिहार्यही असतं. काही संपतं वा थांबतं तिथून नवं काही सुरू होतच असतं. किंबहुना माणसांना काहीच सुरू करता येत नाही वा थांबवताही येत नाही. दोन्ही प्रकारात कृतीचे जे भ्रम असतात त्यांचा निरास फक्त अनुभवाच्या ज्ञानाच्या उजेडातच होतो.

या प्रकारच्या विशाल समझदारीकडं नेणाऱ्या काही दिशा ही कादंबरी प्रस्फुटित करते.

स्वातंत्र्योत्तर मराठी ग्रामसमाजातील बदलाचा, त्याच्या विषयीच्या आस्थेच्या पर्यावरणाचा व सांस्कृतिक आकांक्षेचा एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून सुध्दा या कादंबरीकडं पाहता येईल.

Additional information

Book Author