Description
‘त्रिबंध’ हा श्री. महेश एलकुंचवार यांचा दुसरा ललित लेखसंग्रह.
‘मौनराग’ नंतरचा आणि सर्वार्थाने त्यापलीकडे जाणारा. ललितकला आणि ज्ञानशाखांच्या संयोगभूमीतून असे स्वायत्तविश्व इथे साकारते की स्वप्न, कल्पित आणि वास्तवाच्या सीमारेषा परस्परात विरून जातात. आपले विश्वाचे आकलन त्रि-मितीय जाणीव ओलांडून अपाराकडे झेपावते.
मानवी जाणीव-नेणिवेच्या नानाविध पातळ्यांना व्यक्तिरूप मिळून
प्रत्यक्षातील, कलाकृतींमधील आणि कलावंताच्या मनात विकसित होत जाणाऱ्या व्यक्तिरेखांमधील आत्मीय संवाद असेही रूप या ललितलेखांमध्ये अनुभवायला मिळते. कलानिर्मितीविषयीच्या अनेक गहन प्रश्नांचे प्रतिबिंब या संवादामध्ये पडलेले आहे.
आपल्या जगण्यातील अनेक बंद खिडक्या उघडणारे हे लेखन आपल्या प्रातिभ बळाने मौलिक क्षणांमध्ये कोंडलेले शाश्वत प्रकाशमान करते.






Reviews
There are no reviews yet.