Description

उत्कर्ष हा कोणत्याही एका ठरावीक क्षेत्रापुरता मर्यादित नाही.त्यामध्ये ग्रामीण-शहरी, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय असे कप्पे नसतात. शेतीमध्येही उत्कर्ष साधता येतो. खेड्यातूनही आंतरराष्ट्रीय झेप घेता येते. अनुभव नसतानाही यश मिळते. त्यासाठी ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाचा आधार घेत, जिद्द, कष्ट, सचोटी, गुणवत्ता, समूहाचे भले करण्याची जाणीव, उपेक्षितांना न्याय देण्याची भूमिका, ग्राहकांचा विश्वास, व्यापक समाजहित, स्वयंशिस्त, कार्यसंस्कृती, कामामध्ये वाहून घेण्याची प्रवृत्ती, कौशल्य, व्यवसायाशी बांधिलकी, सहनशीलता, चिकित्सकवृत्ती आणि नेतृत्वगुणांची क्षमता आदी गुण अंगी निर्माण करणे. हे आजच्या काळामध्ये आवश्यक झाले आहे. त्यासाठी संघर्ष करावा लागतो. उत्कर्ष हा सहजसाध्य नसतो. तसा तो अप्राप्यही नसतो.