arrow_back Back to Books
वगसम्राज्ञी कांताबाई सातारकर

वगसम्राज्ञी कांताबाई सातारकर

Vagsamradnyee Kantabai Satarkar

person Dr. Santosh Khedalekar
qr_code ISBN: 9789385527135
calendar_today 2016
menu_book 144 pages
₹200 incl. all taxes
In stock
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

पती तुकाराम खेडकरांच्या अचानक जाण्यानं आकाशच कोसळलं... घरचा धनी... फडाचा मालक असा अचानक गेला.... पैशांची तरतूद नव्हती... चरितार्थाचाही प्रश्न होता... फडही विस्कळीत झाला... पण कांताबाई स्वस्थ बसणाऱ्यातल्या नव्हत्या... त्यांनी पुन्हा जुळवाजुळव केली... पुन्हा फड उभा राहिला... मराठी मुलुखातल्या तमाम जनतेच्या मनोरंजनासाठी ढोलकीच्या तालावर कांताबाईंचे घुंगरू पुन्हा नाचू लागले. भिंगरीसारख्या नाचणाऱ्या कांताबाईंच्या तमाशाचे तंबू हजारोंच्या उपस्थितीने गावोगावी ओसंडत वाहू लागले... खेड्यापाड्यांत वर्षाकाठी दोनशे-सव्वादोनशे दिवस फडातील दोनशे कामकरी, कलाकारांसह आपल्या परंपरागत कलेने मराठी मनाला रिझविण्यासाठी फिरणाऱ्या कांताबाई आज पंच्याहत्तरीनंतरही आपल्याच मस्तीत दंग आहेत... फडाच्या रुपानं खेडकरांचं नाव जिवंत ठेवलं... मुलगा रघुवीर फड चालविण्यास समर्थ बनला... महाराष्ट्र शासनाचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला... थेट दिल्लीत तमाशा सादर करण्याचा बहुमान मिळाला... रसिकांचं उदंड प्रेम मिळालं, कलाकाराला आणखी काय हवं? भल्या पहाटेची शुक्राची चांदणी आजही त्यांना याद देते लाडीवाळपणे रेंगाळणाऱ्या त्या दिवसातल्या लावणीची..!

Book Images

About the Author

person

Dr. Santosh Khedalekar

View Full Profile arrow_forward

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review

You May Also Like