Availability: In Stock

Vangmay Paridarshan | वाङ्मय परिदर्शन

210.00

ISBN – 9789386909930

Publication Date – 08/03/2021

Pages – 135

Language – Marathi

Description

आपण शिकवीत असलेल्या विषयावर प्रेम करणे, त्यातून आनंद मिळवणे आपल्याकडून हा विषय समजून घेण्याची उत्कंठा असणाऱ्या उमलत्या मनांना सहजपणे हलकेच आपल्या आनंदात सामील करून घेणे हे प्रा. संध्या शहापुरे यांच्या व्यवसायाचे मर्म आहे. त्यामुळे युवा विश्वातील उफाळत्या आकांक्षांना व कार्यशक्तीला त्यांनी संस्कारपूर्वक प्रोत्साहन दिले. आपल्या प्राध्यापिकेच्या भूमिकेत त्या विद्यार्थी प्रिय आहेतच तशाच सहकारी प्राध्यापक, संस्था यांच्यातही आदरणीय आहेत. आपल्या वडिलांचा वारसा समाजाभिमुख होत त्यांनी जपला आहे. कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास करून मगच त्यावर लेखन करणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच त्यांच्या लेखनात व्यासंगाचे लखलखीत प्रतिबिंब दिसते.

परिसंवादासाठी निबंध, चर्चासत्रे, समीक्षात्मक लेख अशा क्लिष्ट विषयाबरोबर काव्य, स्फूट, ललित यासाठीचे लेखन असे विविध साहित्य प्रकार त्यांनी अगदी सहजतेने हाताळले आहेत.

प्रस्तावना कशी असावी याचे उत्तम व आदर्श उदाहरण म्हणजे त्यांनी लिहिलेल्या ‘स्वादस्मृति’ व ‘तेजस्विनी’ या ‘निचीता प्रकाशन’ पुस्तकांच्या अभ्यासपूर्ण व ललित अशा प्रस्तावना, त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेने पुस्तकाची उंची वाढवली आहे. कोणताही विषय सहजतेनं हळुवारपणे उलगडणे हे त्यांचे लेखन वैशिष्ट्य आहे. त्यांचा प्रत्येक शब्द व वाक्य आशयघन असते. त्यांचे प्रत्येक काव्य नादमय असते. याशिवाय मानवी मनाशी संवाद साधणारे आहे. निसर्गाबरोबरच सामाजिक भान जागवणारे आहे. तत्वज्ञान, अध्यात्म अशा विषयावरील त्यांचे लेखन सहज समजेल अशा साध्या शब्दात मांडलेले असते.

प्रा. संध्या शहापुरे या मराठी साहित्य विश्वातील एक पानाआड दडलेले सुवर्ण चंपक आहेत त्यांच्या ‘वाङ्मय परिदर्शन’ या पुस्तकात त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये दिसून येतील. रसिकांनी व रसिक वाचकांनी त्याचा आस्वाद घ्यावा. त्यांचा लेखन प्रवास असाच सुगंधमय होवो. – प्रा. अनुपमा कुलकर्णी