Description

वार्धक्याचा प्रश्न हा केवळ माणसाच्या शारीरिक आणि मानसिक व्यथा-वेदनांपुरता मर्यादित नाही. नवनवीन औषधं, उपचार-पद्धती, शस्त्रक्रिया आणि जीव तगवणारी कृत्रिम उपकरणं यांच्या मदतीनं माणसाचं आयुष्य संपत आलेलं असताना, मरण लांबवता येण्याच्या शक्यता आता वाढल्या आहेत. तरीसुद्धा किंवा खरं तर त्यामुळेच अनेक माणसं पूर्वीसारखी उपचाराअभावी मरून न जाता ‘वार्धक्य’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अवस्थेतून जात असतात. विज्ञानाच्या शोधांमुळे माणसाची वाढलेली आयुर्मर्यादा नजीकच्या भविष्यकाळात लोकसंख्येचा एक फार मोठा हिस्सा बनणार आहे. याखेरीज या प्रश्नाची आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक बाजू या प्रश्नाला एका ब्यापक अर्थानं राजकीय प्रश्न म्हणून जाणून घ्यायला आपल्याला भाग पाडणार आहे. जन्माच्या बरोबरीनं सावलीसारखी साथ करणारा मृत्यू अटळ आहे. मृत्यू आहे म्हणूनच जगात थोडी जागा आणि थोडा कमी कंटाळवाणेपणा आहे. मृत्यूला माणसाजवळ पोचण्याच्या नैसर्गिक वाटा माणसानं विज्ञानाच्या मदतीनं बंद केल्यामुळे, स्वेच्छामरणाचा विचार करण्याची आवश्यकता भासते आहे.

विद्या बाळ

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Vruddhansathi Nivadicha Hakka | वृद्धांसाठी निवडीचा हक्क”

Your email address will not be published. Required fields are marked *