Description
आधी सुनील होता. सुनील गीताराम निकाळजे. जगण्यातील स्वत:ची जागा शोधत धडपडत असलेला. लिहिण्याची आकांक्षा असलेला. जातीव्यवस्थेत उतरंडीत तळाशी जन्मूनही आनुषंगिक सवलतींविषयी उदासीन असलेला, तिशीतला तरुण चष्मिस हडकुळा पत्रकार. एके दिवशी अपघातानं ठाण्यातल्या आंबेडकर चौकात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी उपोषण करताना मरून गेलेल्या हतभागी कामगाराला; मल्लराज सिद्रामप्पा होसमुनी याला तो पाहतो. भर चौकात एखादा गरीब माणूस समजा महिनाभर उपोषण करत बसतोय अन त्याची साधी विचारपूस सुद्धा केली गेलेली नाहीय हे त्याला जाणवतं आणि जन्म घेते एक कहाणी, एक शोध, एक रचना. ही कादंबरी सुनीलची आहेच आणि सुनीलनं लिहिलेल्या मल्लराजाच्या जगण्याचीही. एक कादंबरी अन तिच्या पोटात आणखी एक कादंबरी….