Availability: In Stock

Namushkiche Swagat | नामुष्कीचे स्वगत

350.00

ISBN: 9789386909213

Publication Date: 01/03/1999

Pages: 211

Language: Marathi

Description

आणि आता तर माझी खात्रीच झालीय की मला माझ्या वर्तमानाच्या बिंदूवर फारकाळ स्थिर राहताच येत नाही, म्हणजे आपलं वर्तमान असतं ना, म्हणजे आत्ताचा क्षण, तर तिथं मी डळमळतच उभा असतो असं मला सारखं वाटत असतं म्हणजे मी तसा इथंच असतो आणि डळमळत असतो तेव्हा कुठल्या क्षणी कलंडून मी या आखीव अवकाशाच्या कक्षेबाहेर जाईन याची मला खात्रीच देता येत नाही, त्याला मी काय करू? आणि कलंडून बाहेर गेलं की आपले नेहमीचे सगळे नियमच उलथेपालथेच होऊन जातात, सगळं स्वतंत्र कुठेही आणि कधीही, कशाचं कशाशी काही नातंच नसतं, तरीही आपण असतो, बेफामपणे भिरकटत इतस्ततः, त्यावर आपली हुकमत उरत नाही, नात्याची भानगड उरत नाही आणि वेगाला दिशाच नसते कसली, ताबाच नसतो कोणाचा आणि जड शरीर आपलं संपूनच जातं, तेव्हा संवेदना तर असतात पण आकार असा काही नाही, मला दिसतं सगळं, पण मी कोणाला दिसत नाही, मी कोणाचा असत नाही वा माझेही कोणी असंत नाही आणि दुनियाही इतकी चमत्कारिक की, एकाच वेळी ती इतकी असते आणि मी ही एकाच वेळी किती ठिकाणी असतो आणि कोणतंही ठिकाण कोणत्याही ठिकाण असू शकतं, त्याचा कसलाच नियम उरत नाही आणि हे सगळं कोणाला सांगितलं तर पटणार कसं, कारण स्थलकालातलं कलंडणं माझ्याखेरीज आणखी कोणी अनुभवलंय असं कोणी मला भेटलेलंच नाही आणि दुनियेत आता माझा जीवच रमेनासा झालाय हे ही खरं कारण असेल त्याचं आणि या सगळ्या पळण्याच्या भानगडीनं मी हादरून गेलोय रे, तुकडे तुकडे झालेत माझे. आणि मी स्वतःत स्वतःचे तुकडे होऊन गरगरतो, स्वतःच्या बाहेरही गरगरतो आणि वर्तमानाच्या क्षणावर स्थलकालात बांधलेला असतानाही मी काही तुकड्यात या नियमांच्या बाहेरही गरगरतो.

Additional information

Book Author