Description

वारा वाजे रुणझुणा याच पुस्तकात एका हत्तीची सोंड अशी काही रेखाटली गेलीय की, त्या नुस्त्या सोंडेकडे पाहताच आपल्याला संबंध हत्तीचा राजस आकृतीबंध अनुभवल्या सारखा वाटतो. हत्तीलाही एक -दोन पुष्ट रेघांत चितारणारे हे कलावंताचे मन म्हणजेच अखेर या सगळ्या लिरिकल लाईन्स. शब्द, अर्थ, रंग, यांच्या पलीकडे उभ्या असलेल्या, वळणाऱ्या, चैतन्याने रसरसलेल्या या रेघा… यांना मी फक्त ‘विशुद्ध रेषा’ म्हणेन. विशुद्ध काव्याच्या अंगानेच याही रेषा वाहतात. अनेक बिंदूंनी बनणारी ती रेषा असे म्हणतात. पण कलावंताने ओढलेल्या रेघेतच फक्त हे अनेक बिंदू वेगवेगळे पाऱ्यासारखे दिसत राहतात…..