Description
शीलवंत वाढवे यांच्या लेखनाची एक आगळी अशी शैली आहे. ‘हास्यरसायन’ मधला ‘आम्हाला लेखक व्हायचंय’ हा लेख भन्नाटच. अवघ्या दहा दिवसात कवी, लेखक, समीक्षक होण्यासाठी ‘अभिनव कोचींग क्लासेस’ ची योजना अफलातून आहे. कविता कशी करावी, त्यासाठी सिध्दता कशी असावी, सुविचार हा उद्योग आहे, समीक्षकाला विद्याव्यासंग असणे ही अंधश्रध्दा आहे, त्याने अनाकलनीय शब्दांचा आणि इंग्रजी शब्दांचा अधिकाधिक वापर करावा, ह्या एकूणच साहित्याविषयीच्या थोतांडावर वाढ़वे यांनी झगझगीत प्रकाश टाकला आहे. अतिरंजितता वा अर्थहीन विडंबन हा वाढवे यांच्या विनोदी लेखनाचा स्वभाव नाही. मानवी जीवनाचे, वृत्ती-प्रवृत्तींचे मर्मभेदी आकलन विनोदी लेखकाला असावे लागते. कोटीबाजपणातून विनोदनिर्मिती हा उथळ प्रवास असतो. शीलवंत वाढवे ह्यांना त्याचे पुरते भान आहे. ‘हास्यरसायन’ ही त्याची साक्ष आहे.