Description
बालकवींची कल्पनाशील संज्ञा जशी टोकाचे हर्षोल्लास साजरे करते तशी ती टोकाची खिन्नता आणि निराशा यांचे आविष्काराही उत्कटतेने करते. आनंदगीते गाणाऱ्या कवितेचा औदासीन्याकडील प्रवास कालांतराने का आणि कसा सुरू झाला याची एक संगतशीर मीमांसा करण्याचा प्रयत्न या समीक्षेत दिसतो. ही समीक्षा मुख्यत्वे आदिबंधात्मक दृष्टीचा अवलंब करीत असली तरी ती केवळ तिच्याशीच बांधली गेलेली नाही. कवितेचे कवितापण उलगडण्यासाठी ज्या ज्या समीयक्षादृष्टींचा उपयोग होण्यासारखा असतो त्या त्या दृष्टींचा उपयोग ही समीक्षा गरज असेल तेथे करते. त्यापैकी रूपनिष्ठ दृष्टीची या समीक्षेला दिलेली जोड बालकवींच्या कवितेचे सौंदर्यकारक धर्म उलगडून दाखवण्यासाठी विशेष उपकारक ठरलेली आहे.