या पुस्तकाविषयी
वेदना आणि प्रतिभा यांचा संगम म्हणजे साहित्य असेल तर किसन चव्हाण या पारधी तरुणाचं 'आंदकोळ' हे आत्मकथन एक उत्कृष्ट साहित्य कलाकृती ठरायला हवी. मराठी साहित्याच्या अवकाशात खोलवर विस्तारणारे एक वादळ म्हणजे ही कलाकृती आहे. परंपरेनं दिलेलं वेदनामय आयुष्य, माणूस म्हणून नाकारलेली ओळख आणि कपाळावर जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का घेऊन जगणं काही सोपं नसतं. अंगण नसलेल्या आयुष्यात ठाण मांडून बसलेल्या आणि क्षणाक्षणाला आपली नखं वाढवून जखमांचा जल्लोष करणाऱ्या वेदनांविरुद्ध बंड करणं, विद्रोहाचं रणशिंग फुंकणं आणि श्वासागणिक एल्गार पुकारणं, हेही सोपं नसतं. किसन चव्हाण याने स्वतःसाठी आणि भोवतालच्या बिनचेहऱ्याच्या समाजासाठी सातत्याने युद्ध जागे ठेवणारी तुतारी फुंकली आहे. या तुतारीच्या युद्धभेदी आवाजातूनच हे आत्मकथन जन्माला आलं आहे. व्यवस्थेशी दोन हात करत तिचा बुरखा फाडणारं आणि माणसाला आत्मसन्मानाने भरलेला चेहरा बहाल करणारं हे आत्मकथन मराठी साहित्याचे सर्व पारंपारिक मापदंड मोडून मैलाचा नवा दगड ठरावं, असं मला वाटतं. काळजातून बाहेर पडलेलं 'आंदकोळ' साहित्याचा चेहरामोहरा बदलून टाकेल, अशीही मला आशा आहे...
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.