arrow_back Back to Books
बे एकं बे

बे एकं बे

Be Ekam Be

person Sanjay Kalamkar
qr_code ISBN: 9789380617633
calendar_today 2013
menu_book 175 pages
₹300 incl. all taxes
In stock
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

विनोद बुद्धी ही एक देणगी आहे. ती सहजप्रवृत्तीही आहे. ही प्रवृत्ती जगण्यातील विसंगती शोधते आणि ती नेमकेपणाने मांडते. विनोद हा सामाजिक व्यंगावरचा उपचार ठरला आहे. मराठी साहित्यात कोल्हटकर, चिं. वि. जोशी, आचार्य अत्रे, पु.ल.देशपांडे, द. मा. मिरासदार, शंकर पाटील यांनी विनोदी साहित्याची परंपरा समृद्ध केली. संजय कळमकर यांनी त्यांच्या विनोदी लेखनाने मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या प्रयत्नात ग्रामीण भागात शैक्षणिक, राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील वेगवेगळी सत्ताकेंद्रे निर्माण झाली आणि त्यातूनच या क्षेत्रातील नेते आणि पुढारी देखील उदयास आले. काही अपवाद सोडल्यास सुसंस्कृतपणाची वानवाच सगळीकडे पहायला मिळते आहे. या तथाकथित पुढारीपणावर विनोदाच्या माध्यमातून कळमकर अतिशय भेदक शैलीने कधी प्रहार करतात तर कधी ओरखडे, चिमटे काढतात. ऐकणाऱ्याला-वाचणाऱ्याला एकाच वेळेला मनमुराद हसवतात आणि त्याचवेळी अंतर्मुखही करतात. हीच श्री. कळमकर यांच्या लेखनाची खासियत आहे. बे एकं बे या संजय कळमकरांच्या कथासंग्रहातून त्यांच्या खास शैलीचा प्रत्यय वाचणाऱ्याला सातत्याने येत राहतो. नामदेवराव देसाई

Book Images

About the Author

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review

You May Also Like