या पुस्तकाविषयी
प्रवीण दशरथ बांदेकर यांची 'चाळेगत' ही कादंबरी तिच्यातील गांभीर्य, पारदर्शकता, तिची खोली, व्याप्ती व तिच्यातील प्रयोगशीलता या सर्व विशेषांचा विचार करता विशेष उल्लेखनीय ठरते. गेल्या पंचवीसेक वर्षांतील कोकणाचे वर्तमान, या वर्तमानाला आकार देणारे सामाजिक, राजकीय, आर्थिक ऊर्जास्रोत, त्यातून होणाऱ्या बदलांमुळे माणसांची होणारी ससेहोलपट, निर्माण झालेले विक्राळ प्रश्न या कादंबरीमधून बांदेकरांनी वाचकांसमोर ठेवले आहेत. मराठी कथनात्म साहित्यात समुद्र फारसा येत नाही. 'चाळेगत' मध्ये मात्र तो केंद्रस्थानी आहे आणि अत्यंत अभिनव पद्धतीने तो साकार झाला आहे. समुद्र आणि मानवी जीवन या दोन गोष्टी एकमेकांत घुसल्या आहेत याची जाणीव सतत तिच्यात हो राहते. समुद्राच्या भव्यतेचे आणि प्रतीकक्षमतेचे अशा प्रकारचे उदाहरण मराठी साहित्यात विरळाच आहे असे म्हणावे लागेल. मूल्यांचे अध: पतन झालेल्या वर्तमान राजकारणात वेगळ्या भूमिका समंजसपणे समजून घेण्याचे औदार्य राहिलेले नाही. अशा परिस्थितीत या राजकारणाला टीकेचे लक्ष्य करण्यासाठी फार मोठे धैर्य लागते. धोका स्वीकारत जगण्याचे हे धैर्य 'चाळेगत'च्या पानापानामधून जाणवत राहते. मराठी कथनात्म साहित्यात राजकारणातील अपप्रवृत्तीचा परामर्श एवढ्या थेटपणे प्रथमच घेतला जातो आहे, या गोष्टीचाही उल्लेख करणे अगत्याचे वाटते. कादंबरीचे हे ओबडधोबड पण लवचीक प्रारूप कादंबरीतल्या लेखकाला दशावताराच्या खेळातील संकासुराच्या पात्रामधून मिळाले आहे. विदुषकी चाळे करीत व व्यवस्थेचे बुरखे फाडीत हा संकासुर दशावताराच्या खेळामध्ये वावरत असतो. संकासुराची ही सर्व कसरत 'चाळेगत'च्या पानापानात केवळ रचनाकौशल्याची चूष म्हणून आलेली नाही. तिचा संबंध जगण्याच्या, वास्तवाच्या स्वरूपाशी आहे. ते सतत बदलते, आकलनाच्या कक्षेत येणे नाकारणारे, निश्चित उत्तरांना बगल देणारे आहे. अशा वास्तवाला सामोरे जाण्यासाठी तेवढाच लवचीक आकृतिबंध शोधण्याचा हा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे.
पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये
काही पाने वाचा
पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा
पुस्तकाची छायाचित्रे
प्रविण दशरथ बांदेकर यांची पुस्तके
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.
हे देखील पाहा
घडामोडी आणि सन्मान
कात्रण
‘चाळेगत’मध्ये भूमिपुत्रांच्या अस्वस्थतेचे प्रभावी चित्रण—रंगनाथ पठारे
प्रा. प्रवीण बांदेकर लिखित ‘चाळेगत’ कादंबरीत कोकणातील भूमिपुत्रांची अस्वस्थता, सामाजिक-सांस्कृतिक स्थित्यंतरे आणि बदलत्या ग्रामीण…
तरुण भारत
कात्रण
अव्यक्त जाणिवांचे ‘चाळेगत’मधून प्रभावी चित्रण
प्रवीण बांदेकर यांच्या शब्दालय प्रकाशित ‘चाळेगत’ कादंबरीचे सावंतवाडीच्या श्रीराम वाचन मंदिरात ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे…
कात्रण
प्रवीण बांदेकर यांच्या ‘चाळेगत’ कादंबरीचे श्रीराम वाचन मंदिरात प्रकाशन
प्रवीण बांदेकर यांच्या ‘चाळेगत’ कादंबरीचे प्रकाशन श्रीराम वाचन मंदिरात करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांन�…
सकाळ