Arte naa Parte

See more images

Arte naa Parte

अरतें ना परतें

Publisher
Papayrus Prakashan
Published
2024
Pages
152
ISBN
9788195815746
Language
Marathi

₹375

incl. all taxes

Only 1 left

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

लिहिते लेखक वर्तमानकाळाविषयी कसा विचार करतात, समाज आणि संस्कृतीतल्या कळीच्या दुखण्यांविषयी त्यांची काय निदानं आणि वेदना आहेत, हे त्यांच्या अन्यलेखनातून वाचकांना तुलनेनं लवकर पोहचू शकतं. कादंबरी, कथा किंवा कविता वाचकांपर्यंत पोहचायला वेळ लागू शकतो. त्यामुळे मोठमोठे लेखक जाणिवपूर्वक वृत्तपत्रांमधूनही नियमित लेखन करीत आलेले आहेत. तिकडं डिकन्स आणि ट्वेनपासून ते हेमिंग्वे, मार्केझ, माया ॲन्नगेलूपर्यंत अशी बरीच नावं घेता येतील ज्यांनी सर्जनशील मार्ग निवडलेला आहे. हा एकप्रकारे सकारात्मक हस्तक्षेप ठरत असतो. त्यामुळे प्रवीण बांदेकर यांच्यासारख्या संवेदनशील कवीच्या आणि गद्यलेखकाच्या अशा लेखनातून रसरशीत, जिवंत असं संवेदनशील कवीनं चिंतेनं, आस्थेनं, कळवळ्यानं लिहिलेलं गद्य वाचायला मिळतं. या गद्याला लेखकाची स्वतःची अशी खास भाषा, त्याच्या भाषेत सहज वाहात आलेले शब्द, म्हणी, दंतकथा, वाक्यप्रचार आणि वेगळा मालवणी गोडवा आहेच पण त्यापलीकडे एका गंभीर लेखकाचं समांतर चिंतनही आहे.


मानसिक पातळीवर ऊर्ध्वमूल होत जाणारी नाती, त्यातली रहस्यं, ओरबाडला जाणारा निसर्ग आणि पर्यावरणाला अंदाधूंद नाश, अमानूष होत जाणारा माणूस, संस्कृतीसंचितातल्या चीजा दाखवणारं ऐश्वर्य, * पर्यावरणाचा निर्बुद्ध ऱ्हास, कोकणची संस्कृती, मानसिक विस्थापनं, मानवी मनाची गूढं हे सगळं त्याच्या या लेखनातून दिसत असतांना वाचकाच्या मनातही समांतर काही निनादत राहाण्याचे बिंदू त्यातून खचितच मिळतात.


गणेश विसपुते

पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

Pravin Dasharath Bandekar

प्रविण दशरथ बांदेकर | Pravin Dasharath Bandekar

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा