या पुस्तकाविषयी
मन थेंबांचे आकाश – आधुनिक जगण्याचा शोध लावणारा ललित लेखसंग्रह! समकालीन आधुनिक जीवनाने आपल्या जगण्याची गती बदलून टाकली आहे. शांत, संथ जीवन मागे पडले आहे, आणि या वेगवान जगण्यात माणसाच्या मनाची शांती हरवली आहे. अशा काळात माणसाला पुन्हा आठवतात त्या शांत, सौंदर्यपूर्ण आठवणी आणि जीवनाला दिलेला खरा अर्थ. ‘मन थेंबांचे आकाश’ या ललित लेखसंग्रहात लेखक अशोक लिम्बेकर यांनी मानवी मनातील भावना, विचार, कल्पना, आकांक्षा आणि अनुभवांचे अप्रतिम चित्रण केले आहे. समकालीन आधुनिक जीवनाने आपले सगळे जगणेच नियंत्रित केले आहे. या काळातील माध्यमाने आपले पूर्वीचे शांत, संथ जगणे त्याच्या गतीत लपेटून घेतले आहे. या गतीमुळे माणूस आपल्या मनाची शांती हरवून बसला आहे. अशा गतिमान आणि व्यस्त काळात माणसास आठवतात त्या त्याच्या शांत, संथ जगण्याच्या मनोहारी जागा किंबहुना जगण्याचा आशय ! माणूस नेहमी भूत, भविष्य, वर्तमानाच्या त्रिमितीसह आपले जीवन जगत असतो. विविध भावना, कल्पना, विचार यांनी माणसाचे मन व्यापलेले असते. मानवी मनातील या भावना, कल्पना, विचार, इच्छा-आकांक्षा आणि जीवनाला सुंदर, समृद्ध करणारे विविधांगी अनुभव अशा कितीतरी थेंबानी भरलेले हे मनोविश्व म्हणजेच 'मन थेंबाचे आकाश' हा ललित लेखसंग्रह होय ! या लेखनात मानवी जीवनाला सर्वार्थाने समृद्ध करणारे, चिंतनास प्रवृत्त करणारे आस्थेचे विषय समाविष्ट झाले आहेत. मातीचा गंध लाभलेले हे लेखन सहजसुंदर तर आहेच; परंतु त्याबरोबरच ते एका तरल, समंजस, तीव्र संवेदनशील मनाची उत्कट अभिव्यक्ती आहे. ती वाचकांना अंतर्मुख करून जीवनातील सौंदर्याचे, भवतालाचे अनोखे दर्शन घडवते. - डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे
पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये
काही पाने वाचा
पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अशोक लिंबेकर यांची पुस्तके
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.