सुखाची लिपी

Sukhachi Leepi

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
२०२५
पृष्ठे
११९
ISBN
9788196974985
भाषा
मराठी

₹२५०

सर्व करांसह

परत आल्यावर एकच ई-मेल, बाकी काही नाही. खात्याची गरज नाही.

About this book

या पुस्तकाविषयी

ज्ञानापासून जीवनसत्यापर्यंत आणि प्रेमभावनेपासून विज्ञान तंत्रज्ञानापर्यंत सर्वत्र संचार करणाऱ्या मानवी जीवनाची व स्त्री जीवनाची असंख्य चित्रे अभिव्यक्त करणारे हे कथाविश्व आहे. स्वतंत्र विचाराने जगतानाही एकमेकांना जाणूनच हे जगणे सुंदर व अर्थपूर्ण बनवता येते, याची सूक्ष्म जाणीव वाचकांच्या मनात निर्माण करण्याची क्षमता या कथांमधून सूचित होते. तरल भावाभिव्यक्ती, कालसंगत बदललेले विचार, तत्त्वाशी तडजोड न करणारी भूमिका, चिमुरड्यांचे भावविश्व, नात्यांमधील कोवळिकता, माणसांइतकीच निसर्गातून प्रकटणारी प्रेमातील समर्पण भावना, नवे तंत्रज्ञान आणि अनुभवातून बदलणारी जीवनदृष्टी या सर्वांच्या केंद्रस्थानी येणाऱ्या स्त्रीची होणारी घुसमट आणि व्यक्तिगणिक मनोमन उमटणारी भावनिक आंदोलने उभी करण्याचे सामर्थ्य विजया दीक्षित यांच्या कथांमधून प्रत्ययाला येते. यातील बहुतांश कथा स्त्रीकेंद्री असूनही स्त्री-पुरुष नात्यातल्या समंजसपणावर भर देतात. विजया दीक्षित यांची वेदकालाला यथातथ्य चित्रित करणारी व सुखाची लिपी प्रत्ययकारकपणे उमटविणारी मोहक आणि लोभस शब्दकळा या कथांना वेगळी झळाळी प्राप्त करून देते. काळाच्या विस्तीर्ण पटावरील उलगडत गेलेली स्त्रीरूपे तिच्या अंतरंग स्पर्शासह जिवंत करणारे हे कथा विश्व वाचकाला आनंद तर देतेच, पण विचार करायलाही भाग पाडले. कोणतेच विषय वर्ज्य न मानणाऱ्या य कथा निरंतर मनात निनादत राहतात आणि तेच विजया दीक्षित यांच्या कथालेखनाचे बलस्थान आहे. सतीश बडवे

Book highlights

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये

सुखाची लिपी — highlight सुखाची लिपी — highlight सुखाची लिपी — highlight सुखाची लिपी — highlight सुखाची लिपी — highlight
Read a preview

काही पाने वाचा

पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा

About the author

लेखकाविषयी

विजया दीक्षित | VIjaya Dikshit

संपूर्ण परिचय पाहा
More by VIjaya Dikshit

विजया दीक्षित यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like