ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी
₹350
About This Book
ज्ञानेश्वरीला सातशे वर्षे झाली. त्या निमित्ताने ज्ञानेश्वरीचा विविध अंगांनी विचार होत आहे. ज्ञानेश्वरीवर नवे नवे ग्रंथ प्रसिद्ध होत आहेत. त्यांत ज्ञानेश्वरीचा गौरव येतो. सांप्रदायिक भाष्ये भेटतात; आणि ज्ञानेश्वरीतील अध्यात्मशास्त्र, तत्त्वज्ञान, काव्य यांचा विशेषतः ऊहापोह दिसतो. 'ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी' हा ज्ञानेश्वरीच्या वेगळ्या अंगाचे विवेचन करणारा अभिनव ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेवरले केवल भाष्य नाही. तो ज्ञानदेवांनी घेतलेला गीतेचा अनुभव आहे. ज्ञानदेव स्वतःचा हा अनुभव सर्वांसाठी, सभोवतालच्या लौकिक सृष्टीतल्या प्रतिमांद्वारे व्यक्त करतात. ही लौकिक सृष्टी संदर्भसमृद्ध आहे. ज्ञानदेवकालीन समग्र लौकिक सृष्टी आणि तिच्याशी निगडित असलेली तत्कालीन भाषा जाणून घेतल्याशिवाय ज्ञानदेव भेटणार नाहीत या दृढ धारणेने लेखक इथे अविरत शोध घेताना दिसतो. तसाच लेखकाचा ध्यास, साक्षेप आणि शोधक प्रज्ञा यांचाही इथे प्रत्यय येतो.
Book Images
About the Author
म.वा. धोंड | M. V. Dhond
View Full ProfileReviews & Ratings
No reviews yet — be the first to share what you thought of this book.
Sign in to write a reviewYou May Also Like
साहित्यगंध
₹480