दुःखहरण

Dukhharan

लेखक Dr. Sunilkumar Lawate
प्रकाशक
Lokvangmaya Griha
प्रकाशन वर्ष
२०१३
पृष्ठे
१२५
ISBN
9789382789093
भाषा
मराठी

₹१३०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या 'दुःखहरण' या कथासंग्रहातील चित्रणविषयाचा लक्षणीय विशेष म्हणजे; ते ज्या वंचित समूहाचं जग चितारतात, ते सर्वस्वी अभावाचं, दुःखाचं, अनिश्चिततेचं जग आहे. या माणसांचं जीवनचक्र पराकोटीच्या दुःखचक्राला बांधलेलं आहे. दारिद्र्य, अनाथपण, वंचना त्यांच्या वाट्याला आलेली आहे. हे केवळ या माणसांच्या जगण्यातील दुःखाचं, अन्यायाचं किंवा करुणेचं चित्रण नाही. तर लवटेंच्या कथांतील ही माणसं मोडून पडत नाहीत, सदैव जगण्याला दोन हात करतात. उभी राहतात. पुन्हा नव्याने आयुष्य उभं करतात. जीवन जगण्याची अदम्य विजीगिषा त्यांच्यात आहे. जीवनावरच्या या आस्थेपोटीच ती अभावाच्या रिक्ततेच्या जगाला समांतर पर्याय शोधतात, आणि वाटचाल करतात. नैराश्य, उदासीनता, विमनस्कतेच्या गर्तेतून पुन्हा नव्याने जगण्याला कवटाळतात आणि आनंदाने स्वतःच्या जीवनविषयक दृष्टीने आपले मार्ग शोधतात. म्हणून या लेखनातील नायक-नायिका सतत नवं जग आपलंसं करतात. ती केवळ कुढत बसत नाहीत. अशा माणसांच्या या शौर्यगाथा आहेत.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like